Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

जीवनदीप मध्ये विद्यार्थ्यांना एनडीआरएफतर्फे आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

 

                        ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

आपत्ती ही कधीही उद्भवू शकते अशा अचानकपणे उद्भवणाऱ्या नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीवर मात करण्यासाठी, जीविताची हानी टाळण्यासाठी जीवनदीप महाविद्यालयात जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे व तहसीलदार कार्यालय कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने एनडीआरएफच्या जवानांनी विद्यार्थ्यांना आपत्कालीन परिस्थितीत करावयाचे प्राथमिक बचाव कार्य याबाबत प्रात्यक्षिक दिले. जीवनदीप संस्थेचे अध्यक्ष रवींद्र घोडविंदे यांनी कल्याण सर्कल ऑफिसर प्रीती घुडे आणि एनडीआरएफच्या जवानांचे स्वागत केलं.



अध्यक्षांनी विद्यार्थ्यांना या कार्यशाळेचा परिपूर्ण लाभ घ्या म्हणून आवाहन केलं. यानंतर एनडीआरएफच्या जवानांनी आपत्ती म्हणजे काय, त्यापासून आपण कसा बचा करू शकतो, प्राथमिक कोणती पद्धती वापरून रुग्णावर प्रथमोपचार करता येतील. उदा. रक्तस्त्राव थांबवणे, पट्टी बांधणे, रुग्णांना एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी सुखरूप नेणे, स्ट्रेचर बनवणे, तसेच पूरस्थितीत वापरायचे काही साहित्य याची माहिती करून दिली. विद्यार्थ्यांनी देखील सदर कार्यशाळेत उत्स्फूर्त सहभाग घेतला.

मेजर प्रदीप माळी, विक्रम सुतार, गजानन पाथरीकर, बालाजी रणदिवे या सर्व एनडीआरएफच्या जवानांनी विद्यार्थ्यांना उत्तम प्रशिक्षण दिले. प्रा. सतीश लकडे यांनी सूत्रसंचलन व आभार व्यक्त केले. यावेळी प्राचार्य डॉ.अशोक वाघ, उपप्राचार्य हरेंद्र सोष्टे महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग विद्यार्थी यांच्या सर्वांच्या सहभागातून हि कार्यशाळा यशस्वीरित्या संपन्न झाली.


Post a Comment

0 Comments