ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याणात मनसे महिला सेना,आणि विद्यार्थी सेना तसेच पदाधिकाऱ्यांच्या वतीने कल्याणातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित केला होता.सदर सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे कल्याणातील सर्व शाळांमधील दहावीच्या परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांमधून मराठी भाषेत सर्वाधिक गुण मिळवले आहे अशा विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मराठी भाषा या विषयी मोठ्या प्रमाणावर राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले असतांना मनसेने मराठी अस्मिता जोपासत महाराष्ट्राला आपल्या भाषेबद्दल जागरूक करण्याचे मोठे काम केले आहे. त्या पार्श्वभूमीवर कल्याणातील मनसे महिला सेनेच्या राज्य उपाध्यक्षा सौ.चेतना रामचंद्रन, माजी नगरसेविका, क प्रभाग सभापती, शहर सचिव सौ.अर्चना चिंदरकर/लाड ,शहर संघटक,सौ.स्मिता वानखेडे /खरे ,या महिला पदाधिकाऱ्यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष प्रयत्न केले.त्यांना साथ लाभली ती इतर महिला पदाधिकारी आणि विद्यार्थीसेनेच्या पदाधिकाऱ्यांची.
विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभासाठी विशेष करून प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापकांनी निमंत्रित केले होते,शिवाय त्यांचाही आवर्जून सत्कार करण्यात आला.सदर कार्यक्रमाला विद्यार्थी आणि त्यांचे पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अचिवर्स कॉलेजचे संचालक आणि सीए, डॉ.महेश भिवंडीकर यांनी आपल्या ओघवत्या भाषणात विद्यार्थ्यांना करिअर विषयी मार्गदर्शन केले.उपस्थित इतर मान्यवरांनी आपल्या छोटेखानी भाषणात विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना सामाजिक आणि शैक्षणिक विषयावर मार्गदर्शन केले.
हा गुणगौरव सोहळा कल्याण पश्चिमेतील गीता हॉल येथे आयोजित करण्यात आला होता.ह्या सोहळ्यात प्रमुख मान्यवरांनी उपस्थिती लावली.मनसे नेते मा.श्री.अविनाश जाधव,सरचिटणीस आणि मनसे शहर प्रमुख मा.श्री.प्रकाश भोईर,जिल्हा प्रमुख मा.श्री.उल्हास भोईर,राज्य उपाध्यक्षा मा.सौ.उर्मिला तांबे ,सर अध्यक्षा मा. सौ.कस्तुरी देसाई,
जिल्हा अध्यक्ष विद्यार्थी सेना श्री.परेश चौधरी, शहर अध्यक्ष विद्यार्थी सेना श्री.विनोद केणे, आणि अनेक पदाधिकारी उपस्थित होते
Post a Comment
0 Comments