ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
सांस्कृतिक गणेश उत्सव महामंडळ कल्याण,तर्फे गणेश मंडळांचा बक्षिस समारंभ आणि वार्षिक स्नेह संमेलन पार पडले. कल्याण पूर्वेतील आणि ग्रामीण भागातील गणेश मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि गणेश मंडळातील कलाकारांना पुरस्कृत करण्यासाठी कल्याण पूर्वेतील माजी नगरसेवक,आणि महामंडळाचे संस्थापक,श्री महेश गायकवाड यांच्या माध्यमातून हा उपक्रम दरवर्षी आयोजित करण्यात येत असतो.यावर्षीही कल्याण पूर्वेतील तिसाई मंगल कार्यालयात हा सोहळा पार पडला.ह्या प्रसंगी डॉ.श्रीकांत शिंदे खासदार कल्याण लोकसभा प्रमुख उपस्थिती लाभली.तसेश श्री राजेश मोरे विद्यमान आमदार कल्याण ग्रामीण,श्री.विश्वनाथ भोईर विद्यमान आमदार कल्याण पश्चिम,श्री.संजय जाधव,अप्पर पोलिस आयुक्त,कल्याण.श्री अतुल झेंडे पोलिस उपायुक्त,परिमंडळ 3 कल्याण.श्री कल्याणजी घेटे सहाय्यक आयुक्त,श्री.हेमंत गुरव, वरिष्ट पोलिस निरीक्षक कोळसेवाडी कल्याण पूर्व.आदी मान्यवरांनी सदर कार्यक्रमाला उपस्थिती लावली.तसेच सांस्कृतिक गणेश उत्सव महामंडळाचे अध्यक्ष श्री मुकेश झा, आणि उपाध्यक्ष श्री चैनू जाधव यांच्या सह असंख्य कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते
प्रमुख पाहुण्यांनी सदर उपक्रमाबद्दल खूप कौतुक करून असे कार्यक्रम हे आपल्या समाजातील सांस्कृतिक कार्यक्रमांना आणि त्यात दिवसरात्र काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देत असते.त्यातून अनेक सामाजिक उपक्रमांनाही बळ मिळते.असे बक्षिस समारंभ कायम चालू राहावे अशी सदिच्छा व्यक्त केली.
Post a Comment
0 Comments