Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

प्रमोदकुमार चौबे यांच्या नेतृत्वाखाली भव्य कलश यात्रेचे आयोजन

 

             ब्लॅक अँड व्हाईट अंबरनाथ वार्ताहर 

अंबरनाथ मधील शिवसेना  उत्तरभारतीय शहराध्यक्ष प्रमोदकुमार चौबे यांच्या माध्यमातून आणि समाजसेविका तसेच शिवसेना शहर संघटिका सौ.किरण प्रमोदकुमार चौबे यांच्या नेतृत्वाखाली भव्य कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. 

श्रावण मासा निमित्ताने दरवर्षी प्रमाणे  ह्या कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.परिसरातील उत्तरभारतीय महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून आला.प्रमोदकुमार चौबे यांनी चारधाम यात्रा करून  पवित्र नद्यांचे जल आणून शहरातील शिवमंदिरात जलाभिषेक करण्यासाठी शेकडो महिलांना कलश देण्यात आले होते.अत्यंत पवित्र भावनेने ही कलश यात्रा भर पावसात पूर्ण झाली.





सदर कलश यात्रेसाठी राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.ह्या कार्यक्रमाला प्रमुख  अतिथी म्हणून अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर,माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी,माजी उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख,माजी जेष्ठ नगरसेवक उमेश गुंजाळ,

सुभाष साळुंखे,पुरषोत्तम उगले महाराज.तसेच शिवसेनेचे अनेक आजी माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.आमदार बालाजी किणीकर आणि सुनील चौधरी यांच्या हस्ते भगवान शंकराच्या  प्रतिमेस आणि  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मंगल कलश यात्रेचा शुभारंभ करण्यात आला.परिसरातील अनेक उत्तर भारतीय महिला पुरुष  मोठ्या संख्येने ह्या यात्रेत सहभागी झाले होते.



Post a Comment

0 Comments