डॉ वर्षा जाधव BDS.यांच्या डेंटल क्लिनिक चे उद्घाटन शनिवार 26/7/2025 रोजी टिटवाळा येथे पार पडले.
ब्लॅक अँड व्हाईट टिटवाळा वार्ताहर
मीरादत्त डेंटल केअर मल्टी स्पेशालिटी आणि इन्प्लांट सेंटर सदर आधुनिक क्लिनिकचे उद्घाटन मा.किसन कथोरे,आमदार मुरबाड विधानसभा मतदार संघ, मा.विश्वनाथ भोईर आमदार, कल्याण विधानसभा मतदार संघ,यांच्या शुभ हस्ते पार पडले.
सदर प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून.. माजी आमदार नरेंद्र पवार कल्याण पश्चिम,प्रमोद हिंदुराव,उपाध्यक्ष,राष्ट्रवादी काँग्रेसपक्ष, ठाणे जिल्हा सह.बँकेचे उपाध्यक्ष,अरुण पाटील,रवींद्र घोडविंदे,सभापती कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती,निलेश सांबरे शिवसेना उपनेते,माजी नगरसेवक श्री.संतोष तरे,सौ.उपेक्षा भोईर,माजी उपमहापौर,किरण सोनवणे,शिवसेना प्रवक्ते,श्री. रवि पाटील शिवसेना कल्याण शहर प्रमुख,श्री.बाळा कुंभार पोलिस निरीक्षक टिटवाळा पोलीस स्टेशन, आदी सर्व मान्यवरांनी उपस्थिती लावली.आणि डॉ.वर्षा जाधव यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
ह्या मंगल प्रसंगी डॉ वर्षा जाधव यांच्या आई वडिलांनी आपल्या मुलीची कारकिर्द यशस्वी होण्यासाठी खूप खूप आशीर्वाद दिले.तसेच भाऊ,बहीण आणि इतर कुटुंबीयांनी डॉ वर्षा जाधव यांना शुभेच्छा दिल्या. डॉ वर्षा यांनीही आपल्या आई वडिलांच्या कष्टाचे हे फळ असल्याचे सांगत आपल्या यशाचे श्रेय आईवडिलांना बहाल केले.तसेच ह्या सेंटर मध्ये प्रत्येक रुग्णाला अत्यंत वाजवी आणि कमी दरात ट्रीटमेंट मिळेल,याची ग्वाही दिली.
Post a Comment
0 Comments