Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

मोहोने एनआरसी परिसरात बिबट्याच्या वावराने भीतीचं वातावरण

 

बिबट्याचा व्हिडीओ वायरल झाल्याने

नागरिकांना सतर्कतेचं आवाहन


                 ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

मोहोने गावातील एनआरसी परिसरात बिबट्या सारखा वन्यप्राणी फिरताना आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.  ही घटना अदानी कंपनीच्या सुरक्षारक्षकांच्या निदर्शनास आली असून, रात्री गस्त घालताना जंगलाच्या सीमेलगत बिबट्या सदृश्य प्राण्याला पाहिल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेनंतर नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

एनआरसी परिसर हा वन्यप्राण्यांच्या नैसर्गिक वावराचा भाग असल्याने यापूर्वीही येथे प्राणीदर्शनाच्या घटना घडल्या आहेत. मात्र यावेळी बिबट्यासारखा प्राणी थेट वस्तीच्या आसपास दिसल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वनविभागाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणीही होत आहे.



यासंदर्भात कल्याण वनविभागाचे अधिकारी निलेश आखाडे यांनी सांगितले की, “घटनेची माहिती मिळताच संबंधित बीटचे कर्मचारी सानप, भाऊसाहेब आणि इतरांसह घटनास्थळी पाठवण्यात आले असून, स्थानिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.” त्यांनी असेही स्पष्ट केले की, “मानवी वस्तीत चुकून शिरलेला बिबट्या अथवा चित्त्यासदृश्य प्राणी सहसा फार वेळ थांबत नाही, तो काही किलोमीटर लांब जातो. त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये, पण दक्षता आवश्यक आहे.”



वनविभाग आणि प्रशासनाने घटनास्थळी पहाणी सुरू केली असून, परिसरात गस्त वाढवण्यात आली आहे. लवकरच प्राण्याची ओळख निश्चित करून आवश्यक ती उपाययोजना केली जाईल, असा विश्वासही स्थानिक प्रशासनाने व्यक्त केला आहे.

 काल मध्यरात्री एनआरसी कंपाउंड अदाणी वेअरहाऊस जवळील रस्त्याकडून मौजे आंबिवली स नं.11,25,27 मधील वनक्षेत्रकडे जातांना बिबट्या हा वन्यप्राणी स्थानिक नागरिकांना दिसून आला होता. तसेच आज सकाळच्या सुमारास मौजे मानिवली गावाकडील भागात बिबट्या हा वन्यप्राणी दिसून आल्याची बातमी मिळाली होती. त्या अनुषंगाने या दोन्ही घटनास्थळी जाऊन पाहणी केली व तेथील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले व बिबट्या वन्यप्राण्याबाबत जनजागृती केली असल्याचे आखाडे यांनी सांगितले.


Post a Comment

0 Comments