Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कल्याणमध्ये जीबीएसचा संशयित रुग्ण खाजगी रुग्णालयात रुग्णावर उपचार सुरु

 

खाजगी रुग्णालयात रुग्णावर उपचार सुरु


                   ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रात संशयित जीबीएस रूग्ण आढळला असून त्यांच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू असून रूग्णाची प्रकुती स्थिर असल्याची माहिती अधिकारी सूत्रांकडून माहिती आहे.  केडीएमसी मुख्य वैद्यकीय अधिकारी दीपा शुक्ल यांनी यानिमित्ताने माहिती दिली की, गुइलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) आजाराचा संशयित रूग्णावर खाजगी गुरुवारी आढळला असून त्या रूग्णावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. यानिमित्ताने नागरिकांना स्वच्छता  बाबत काळजी घेणे हात स्वच्छ धुणे, तसेच कच्चे मांस, कच्चे अन्न खाऊ नये. आठवड्यापूर्वी अतिसार, विकनेस जाणवत असेल तर वेळीच उपचार घेणे ही खाबरदारी घ्यावी.


Post a Comment

0 Comments