Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

रोटरी क्लब ॲाफ न्यू कल्याणच्या अध्यक्षपदी धीरेंद्र सिंह

 

                  ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

रोटरी क्लब ॲाफ न्यू कल्याणच्या अध्यक्षांचा पदग्रहण सोहळा पार पडला.  धीरेंद्र सिंह तसेच  नामदेव चौधरी यांनी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३१४२ चे प्रांतपाल हर्ष मकोल यांच्या उपस्थितीत अनुक्रमे अध्यक्ष व सचिव पदाचा पदभार स्वीकारला. रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४२ चे अनेक मान्यवरही याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

नवनिर्वाचित अध्यक्ष धीरेंद्र सिंह यांनी  रोटरीच्या इतिहासाला जागून निरनिराळ्या समाजोपयोगी कामांवर भर देणार असल्याचे जाहिर केले. त्याची सुरुवात 'थालेसेमियाचे उच्चाटन' या उद्देशाने गेल्या १५ दिवसांत २ रक्तदान शिबिरे आयोजित करून तब्बल १२५ युनिट रक्त जमा करून झाली. त्याचबरोबर, रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याणच्या पुढाकाराने कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या भागातील सर्व रोटरी क्लब मिळून उल्हासनगर येथील सरकारी मध्यवर्ती रुग्णालयातील थालेसेमिया केअर सेंटर दत्तक घेण्यात आले आहे.


रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याण तर्फे गेली सहा वर्षे रोटरी दिव्यांग सेंटर अव्याहतपणे चालू आहे. या सेंटरमध्ये हात किंवा पाय गमावलेल्या गरजू दिव्यांगांना मोफत कृत्रिम हात वा पाय बसवून दिले जातात. वेगवेगळ्या स्तरावरील लहान बाळांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच या सुविधेचा लाभ होत आहे. या व्यतिरिक्त ग्रामीण भागांतील शाळांची डागडुजी, अद्ययावत सुविधा यासाठी रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याण कायम आग्रही आहे. रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याण समाजातील विविध स्तरांतील नागरिकांसाठी निरनिराळ्या विषयांवर (शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, जल नियोजन, महिला व बालविकास इत्यादी) कामे करत आली आहे व यापुढेही करत राहील अशी ग्वाही अध्यक्ष धीरेंद्र सिंह यांनी दिली. 

या सर्व उपक्रमांसाठी निधी संकलनाच्या हेतूने रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याण दर वर्षी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॅराथॉन स्पर्धेचे आयोजन करत असते. यावर्षी २३ नोव्हेंबर २०२५ रोजी होणाऱ्या मॅराथॉन मध्ये सर्व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन ही केले. यानंतर माजी सचिव रमेश मोरे यांनी आभार प्रदर्शन केले. 

Post a Comment

0 Comments