माजी नगरसेविका विणा जाधव यांच्या
प्रयत्नांना यश
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
शिवसेना प्रभाग क्रमांक 38रामबाग सिंडीकेट प्रभागातील माजी नगरसेविका विणा जाधव यांच्या प्रयत्नाने कल्याण पश्चिम रामबाग सिंडीकेट परिसरातील आलिशान एन एक्स, रिध्दी सिध्दी, स्वरांजली, श्री गणेश टाँवर आदी सोसायटीच्या सदनिकांना घरगुती महानगर गँस पाईप लाईन देण्यात आली असून त्याचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विणा जाधव यांनी निवडणुकीत दिलेल्या वचनाची वचनपूर्ती केली आहे.
यावेळी माजी नगरसेवक गणेश जाधव यांनी सांगितले की गँस सिलेंडर घेण्यासाठी आँनलाईन नंबर लावावा लागतो, तसेच वेळेवर गँस बाटला मिळत नाही. यासाठी कल्याण पश्चिम रामबाग परिसरात पाईप द्वारे गँस लाईन घरोघरी सदनिकांना देण्या बाबत सातत्याने पाठपुरावा सुरु होता. याबाबत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व महानगर गँस अधिकारी यांची बैठक घेतली. यासाठी खासदारांनी मोलाचे सहकार्य केले, निवडणूकीत दिलेल्या वचनाची वचनपूर्ती केली असल्याचे सांगितले.
यावेळी कार्यक्रमाला माजी नगरसेविका विणा जाधव, युवासेनेचे उपशहर अधिकारी श्रेयस जाधव, विभाग प्रमुख संजोग गायकवाड, शाखाप्रमुख अभय कामल्य, उपशाखा प्रमुख दिपक तांबे, दिपक दुसाने, नरेंद्र नागरे, वेणू शेट्टी, राकेश तिवारी, किशोर दिवटे, अनिल गाजरे, प्रकाश गवाणकर, मिलिंद कुळकर्णी, हेमंत विंचूरकर, सुधीर कुळकर्णी, प्रकाश खैरनार, सतीश सावंत, शशिकांत चांदेकर, रमेश कळमकर, दिलीप कडैकर, मोहीत झोझवाला, हिरमेठ, अँथनी चेमेस्ट, प्रतिक दगडे, किरण पाटील, तसेच महिला आघाडीच्या उज्वला कामल्य, मीना बोपटे, सविता तांबे, शोभा बोडै, प्रिया खापरे, वैशाली चौधरी, धनश्री मगर, विजया दुसाने, साक्षी शिंदे, नुतन टेमघरे, आशा घरदाळे, नलिनी घरदाळे, वर्षा ठोंबरे, लिना बागल आदी उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments