मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी
व्यक्त केले समाधान
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण परिमंडळ तीनमध्ये पोलिसांनी मोबाईल चोरीच्या घटनांवर आळा घालत तब्बल 11 लाख 18 हजार ७८० रुपये किमतीचे मोबाईल हस्तगत केले आहेत. विशेष म्हणजे हे सर्व मोबाईल पोलिसांनी तपास पूर्ण करून पुन्हा मूळ मालकांकडे सुपूर्द केले आहेत. ही उल्लेखनीय कामगिरी कल्याण परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. त्यांनी विशेष तपास पथकांची स्थापना करून चोरीच्या प्रकरणांना प्राधान्याने तपासण्याचे आदेश दिले. या पथकांनी तांत्रिक विश्लेषण, लोकेशन ट्रॅकिंग आणि डिजिटल साधनांचा वापर करून अनेक गुन्ह्यांमध्ये चोरीला गेलेले मोबाईल शोधून काढले. हरवलेला मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले.
सन २०२४ व सन २०२५ मधील कल्याण विभागातील खडकपाडा पोलीस ठाणे, बाजारपेठ पो. ठाणे, महात्मा फुले पो. ठाणे व कोळसेवाडी पो. ठाणे हददीतील नागरीकांचे वापरातील मोबाईल गहाळ झाल्याबाबत, चोरी झाल्याबाबत पोलीस ठाण्यात माहिती प्राप्त झाली होती. या गहाळ चोरी झाल्या बाबतच्या मोबाईल फोनचा शोध घेण्याबाबत पोलीस उप आयुक्त अतुल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या मागदर्शनाखाली खडकपाडा पोलीस ठाणे, बाजारपेठ पो. ठाणे, महात्मा फुले पो ठाणे व कोळसेवाडी पो. ठाणे मध्ये तांत्रिक ज्ञान असलेले पोलीस अधिकारी व अंमलदार यांची पथके नियुक्त करण्यात आली होती. या पथकानी सीईआयआर या पोर्टलचा वापर करून तांत्रिक विश्लेषण करून गहाळ झालेले चोरी झालेले मोबाईल हस्तगत करण्यात आलेले आहेत.
हस्तगत करण्यात आलेले एकूण ७२ मोबाईल फोन एकूण ११ लाख १८ हजार ७८० रू. किंमतीचे संबधीत तक्रारदार यांना ओळख पटवुन आज बुधवारी पोलीस उप आयुक्त अतुल झेंडे यांच्याहस्ते हस्तांतरीत करण्यात आले. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे, खडकपाडा पोलीस स्टेशनचे व.पो.नि. डॉ. अमरनाथ वाघमोडे, कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे व.पो.नि गणेश न्ह्यायदे आदींसह इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments