ब्लॅक अँड व्हाईट विशेष लेख
गुरुवार, दिनांक ०३ जुलै २०२५ रोजी हिंदी फिल्म ईंडस्ट्रीमधील "बेताज बादशहा" व एकमेव "डाॅयलाॅग किंग" म्हणून ओळखले जाणारे राजकुमार (जानी) यांच्या २९ व्या पुण्यतिथी निमित्ताने मी खालील प्रमाणे विनम्र श्रध्दांजली वाहतो.
"मदर ईंडिया" पासून राजकुमारच्या करियरला सुरुवात झाल्यानंतर "वक्त" ने त्यांची परीक्षा घेतली व सदर परीक्षेत शंभर टक्क्यांनी पास झाल्यावर त्यांनी लगेचच "हिंदुस्थान की कसम" घेतल्यावर प्रेक्षकांनी त्यांना "बुलंदी" वर नेऊन पोहचविले आणि ते नंतर "उॅंचे लोग" मध्ये वावरु लागले व ते या धरतीवर एक "उजाला" बनून "सुर्या" चे एक नवीन तेज प्रृथ्वीतलावर पोहचविले जणू कांहीं "हिर-रांझा" एक "पैगाम" घेवून आले व लोकांच्या मनामध्ये "दिल एक मंदिर" ची जागा मिळविली. अशा रितीने स्वतःच्या "जिंदगी" ला राजकुमार जानीने सुरूवात करून तिन्ही लोकात "हमराज" चे वर्चस्व स्थापन केले व भारतावर "तिरंगा" अवघ्या "३६ घंटे" मध्ये रोवला. असा हा "दिल का राजा" हिंदी फिल्म ईंडस्ट्रीमध्ये "बेताज बादशहा" म्हणून ओळखले जावू लागले आणि अधूनमधून "शरारत" करीत करीत त्यांनी "ईन्सानियत के दुश्मन" चा मुकाबला करुन ईन्सानियत के देवता" ची मुहुर्त मेढ जनमानसात रोवली आणि "कोणत्याही "मर्यादा" चे उल्लंघन न करता अशा त-हेने "एका नई पहेली" सादर केली आणि "पाकीजा" च्या डोळ्यात "काजल" घालून अतिशय दु:खी अंतकरणाने तिला म्हणाले की, "दिल अपना और प्रित परायी" असे सांगून त्यांनी "मुकद्दर का फैसला" केला व त्यांच्या असंख्य चाहत्यांनी ह्या "सौदागर" चा गौरव करुन कपाळी "राजतिलक" लावला. व शेवटी राजकुमार (जानी) ने आपल्या अनोख्या शैलीत डाॅयलाॅग मारला - हमको मिटा सके, ये जमाने में दम नहीं, हमसे जमाना खुद है, जमानेसे हम नहीं. आणि सरतेशेवटी स्वतःच्या मनाला चाहुल* *लागताच बुलावा आ गया* *असे म्हणत व कोणालाही कांहीही न सांगता या जगाचा निरोप घेवून जानी अनंतात विलिन झाले व ही दुनिया राजकुमार (जानी) ह्यांना "मरते दम तक" विसरणार नाही.
*हिंदी फिल्म ईंडस्ट्री मधील "बेताज बादशहा" आणि एकमेव "डाॅयलाॅग किंग" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजकुमार (जानी) यांच्या दिनांक ०३.०७.२०२५ रोजीच्या २९ व्या स्मृतिदिनाप्रीत्यर्थ त्यांचे अतिशय लोकप्रिय झालेले असे निवडक दमदार २९ संवाद सादर करीत आहे.*
१. चिनाॉय सेठ, जिनके अपने घर शिशेंके हों,
वो दुसरोंके घरोंपर पत्थर नही फेंका करते.
--- वक्त
२. यह बच्चों की,खेलनेकी चीज नहीं,
हात कट जाये तों खुन निकल आता हैं.
--- वक्त
३. दादा तो ईस दुनिया में,
सिर्फ दो है, एक उपरवाला और दुसरे हम.
--- मरते दम तक
४. बोटीया नोचनेवाला गिधड,
गला फाडनेसे शेर नहीं बन
जाता है, अच्छा है कि तुम
जानलो, राणासे लढना,
तुम्हारे बस की बात नहीं.
--- मरते दम तक
५.शायद डीके जानता नहीं कि,
राणा के शतरंजका घोडा,
अढाई घर नहीं चालता,
सिधे राजाको मार डालता है.
... मरते दम तक
६. तुफान में हम, अपनी खुशी
चाहते है, जान हथेलेपी
लिये, जीते है, तो वो जो
समुंदर जिन्हे का जाता है,
हम वो संमुदरको, पी जाते
है.
--- पुलिस-पब्लिक
७. हम वो कलेक्टर नही,
जिनका फुंक मारकर
तबादला किया जाता है,
कलेक्टरी तो हम शौकसे
करते है, रोजी रोटी के
लिये नहीं.
--- सुर्या
८. खुदीको कर बुलंद ईतना,
कि हर तकदीर से पहले,
खुदा बंदेसे खुद पुछे,
बता तेरी रजा क्या है?
--- बुलंदी
९. आपके पाॅंव देखे, बहोत
हसीन है, उन्हे जमींपर मत
उतारीएगा, मैले हो जायेंगे,
आपका एक हम सफर.
--- पाकीजा
१०. बेटी, हम कब आते है
और कब चले जाते है,
ये तो उपरवाले को भी
मालूम नहीं.
--- सौदागर.
११. मिनिस्टर साहब, काला कौंवा ऊंचाईपर बैठनेसे,
कबुतर नहीं बन जाता और गरम पानी से
घर जला नहीं करतें. हमारे ईरादोसे टकराओगे
तो अपना सर फोड बैठोगे.
--- पुलिस-पब्लिक
१२. हम तुम्हे गोली मारकर,
हमारी बंदुक को बदनाम
नहीं करना चाहते.
--- मर्यादा
१३. हम उन बादशाहोमेंसे है,
जिन पर किसी भी दौर का
असर नहीं होता, क्योंकी
हमारी सल्तनत की सरहद
ईन्सानियतकी देहलिजसे
शुरु होकर और
ईमानदारीके ईलाकेसे
गुजरती हुई दिल्लीके
दरवाजे मे खत्म होती है.
--- बेताज बादशहा
१४. दुनिया जानती है कि जब,
राजेश्वर दोस्ती करता है तो,
अफसाने लिखे जाते है,
और दुश्मनी करता है तो,
इतिहास बन जाता है.
--- सौदागर
१५. बिल्ली के दांत गिरे नही,
और चला शेर के मुॅं मे हाथ
डालने , ये बद्तमिज हरकते
अपने बापके सामने घरके
आ़ंगन मे करना, सडको पर
नही.
--- बुलंदी
१६. हम अपनी कदमोंके
आहटसे, हवा का रुख
बदल देते है.
--- बेताज बादशाह
१७. हम खैरात नहीं लेते,
हम तुम्हे मारेंगे और जरुर
मारेंगे, लेकिन बंदुक भी
हमारी होगी, गोली भी
हमारी होगी, और वक्त भी
हमारा होगा.
--- सौदागर
१८. याद रखो, जब विचार का
दिप बुझ जाता है, तो
आचार अंधा हो जाता है,
और हम अंधेरा फैलाने नही,
अंधेरा मिटाने आये है.
--- गाॅड अॅन्ड गन
१९. तिरंगा के खिलाफ, तुमने
कोई भी कदम उठाया,
तो हम तुम्हे वो मौत देंगे,
जो ना किसी कानुन कि
किताब मे लिखी होगी और
ना ही किसी मुजरीम ने
सोची होगी.
--- तिरंगा
२०. शेरको सांप और बिच्छु
काटा नंही करते,
दुर दुरसे ही रेंगते हुये.
निकल जाते है.
--- सौदागर
२१. हम कुत्तोंसे बात नहीं
करते, डी के, बोटींया
नोचनेवाला गिधड, गला
फाडनेसे शेर नहीं बन
जाता.
--- मरते दम तक
२२. हम आंखोसे सुरमा नही
चुराते, हम आंखे ही चुरा
लेते है.
--- तिरंगा
२३. वफा से चला है,
मोहोब्बत का नाम,
वफादार यारोंको,
मेरा सलाम.
--- महावीरा
२४. आपके पाॅंव देखे,बहोत हसीन है, ईन्हे जमींपर मत उतारियेगा, वरना मैले होजायेंगे, आपका एका हमसफर.
--- पाकिजा
२५. बेवफा को, वफा मिलती
नहीं, दर्द मिलता है,
दवा मिलती नहीं.
--- महावीरा
२६. बहोत कम बॅंहा खुन,
जमीनो की खातिर,
कटे सर हजारों,
हसीनों के खातिर.
--- महावीरा
२७. हवांओके टकरानेसे, पहाड मे सुराख नहीं हुआ करते.
--- ईन्सानियत के दैवता
२८. हार जीत तो बहाद्दूर के
किस्मत के दो सितारे है,
एक तराजू में हार और
दुसरे तराजू में जीत होती है.
--- धरमकांटा
२९. हमको मिटा सके,
ये जमानेमें दम नही,
जमाना हमसे है ,
जमानेसे हम नहीं.
--- बुलंदी
*"राजकुमार (जानी)" हे हिंदी सिनेमा जगतातील एकमेव हिरो असे होते की, थिएटर मधील पडद्यावर एन्ट्रीच्या सीनला नुसता बुटांचा आवाज आला की अख्खं थीएटर टाळ्या, शिट्ट्यांनी दणाणून जात असे. सुटाबुटात, मोठ्या रुबाबात, हातातला पाईप सावरत, आपल्या वजनदार आवाजानं ज्यांनी प्रत्येक डायलॉग अजरामर केला. हा रुबाब फक्त सिनेमातच नव्हता तर खऱ्या आयुष्यातही ते फक्त स्वत:च्या नियमांवर जगले. ज्यांच्या अभिनय क्षमतेवर चर्चा होऊ शकेल. पण हिंदी सिनेमात स्टाईल आणि डायलॉगची जेव्हा चर्चा होईल तेव्हा मात्र आपल्या खरखरीत आवाजात "जानी....." म्हणणाऱ्या राजकुमार यांचं नाव सगळ्यात आधी घेतलं जाते.*
हिंदी फिल्म ईंडस्ट्रील या अशा महान, बेजोड व अद्वितीय कलाकार राजकुमार (जानी) यांच्या पवित्र स्मृतींना एका चाहत्याची विनम्र भावपूर्ण आदरांजली.
श्री. वसंत शामराव उटीकर,
राजकुमार(जानी)चा एक चाहता,
भायखळा (पुर्व),मुंबई
९३२४५६१५९१/ ७५०६१८५६४१.
Post a Comment
0 Comments