ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पदी निवड झाल्याबद्दल सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. काशिनाथ सहादू नरवडे यांची कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल भव्य सत्कार समारंभ दिनांक 2 जुलै रोजी कल्याण बॅकवेट हॉल, ए.पी.एम.सी मार्केट यार्ड , येथे आयोजित करण्यात आले.
काशिनाथ सहादू नरवडे हे कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीवर संचालक पदी निवडून आले. ही निवड व्यापारी व शेतकरी वर्गांच्या हितासाठी अत्यंत महत्त्वाची मानली. त्यांच्या यशस्वी निवड बद्दल त्यांचा सन्मान करण्यासाठी व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा आभार प्रदर्शन व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.
यावेळी या सत्कार समारंभात यावेळी आमदार राजेश मोरे, नवीन संचालक मंडळ रवींद्र घोडवीदे , कल्याण मुरबाड ग्रामीण जिल्हाप्रमुख अरविंद मोरे, माजी नगरसेवक इकबाल शेठ, माजी नगरसेवक विष्णू गायकवाड, माजी जिल्हा अध्यक्ष रमेश हनुमंते , माझी सचिव रमाकांत चौधरी , सहाय्यक सचिव शैलेश सूर्यराव , माझी सहाय्यक सचिव दयानंद पाटील , वाहतूक सेना दीपक लोखंडे ,सचिन कपिल थळे, कल्याण खडकपाडा शाखा बँक मॅनेजर सुखदेव खेर , गणेश अरुण पाटील, योगेश धुमाळ, जालिंदर पाटील, शंकर आव्हाड, रवींद्र शंकर आवाड, अरुण पाटील, बळीराम लोने, मनोहर पाटील, शारदायी हरिश्चंद्र पाटील, जनावर मार्केट सरफुद्दीन शेख , अखिल भाई, रमजान शेठ, गोविंद शेठ गडदे, सनद भाई, सलमान भाई भाजी मार्केट, फैजल तानकी, नातेवाईक , मित्रपरिवार, कल्याण फुल मार्केट, व्यापारी संघटना ,अनेक मान्यवर उपस्थित होते. आलेल्या मान्यवरांनी काशिनाथ सहादू नरवडे यांना पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या .
Post a Comment
0 Comments