Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

निवडणुक प्रभाग रचनेसंदर्भात अफवा पसरविणाऱ्या विरुध्द कायदेशीर कारवाई करण्याचा केडीएमसीचा इशारा

 


                   ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

महाराष्ट्र शासनाकडून महानगरपालिकांचा सार्वत्रिक निवडणूका घेण्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला असुन, सदर निवडणूकांसाठी महापालिकांची प्रभाग रचना करण्याबाबतचे आदेश-२०२५ दि. १० जुन, २०२५ रोजी निर्गमित करण्यात आलेले आहेत. या आदेशात प्रभाग रचना करणेसंबधात मार्गदर्शक तत्वे व नियम निश्चित केलेली आहेत.

तसेच दि. २३ जुन, २०२५ रोजी प्रभाग रचना करणेबाबत शासनाने सुधारीत कालबध्द कार्यक्रम आखून दिलेला आहे. त्यानुसार महापालिका स्तरावर दिनांक ३१ जुलै, २०२५ पावेतो प्रारुप प्रभाग रचना मसुदा तयार करावयाचा असुन, राज्य शासनाकडे मान्यतेसाठी सादर करावयाचा आहे. या  प्रारुप प्रभाग रचनेस  राज्य निवडणूक आयोगाची मान्यता मिळाल्यानंतर त्यास जाहिररित्या प्रसिध्दी दयावयाची असुन, नागरीकांच्या हरकती/सूचना दिनांक २२ ते २८ ऑगस्ट, २०२५ च्या दरम्यान मागविणेत येणार आहेत. त्यासाठी शासन राजपत्र, राज्यस्तरीय वर्तमानपत्र, महाराष्ट्र शासन व महापालिकेच्या अधिकृत वेबसाईट आणि महापालिका कार्यालयाच्या नोटीसबोर्डवर प्रसिध्दी दिली जाणार आहे. या कालावधीत आलेल्या हरकती/सूचनांवर शासनाकडून नियुक्त केलेल्या प्राधिकृत अधिकारी यांचेकडून सुनावणी घेण्यात येणार आहे. हरकती/सुचना वरील शिफारशी विचारात घेऊनच मा. निवडणूक आयोगाच्या मान्यतेने प्रभाग रचना अतिंम केली जाणार असुन, त्यासही व्यापक प्रसिध्द देण्यात येणार आहे.

 शासनाच्या आदेशानुसार प्रारुप प्रभाग रचना तयार करण्याची कार्यवाही अत्यंत गोपनीयरित्या कल्याण डोंबिवली महापालिकेमार्फत सुरु आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून अजूनपर्यंत कोणतीही प्रारुप प्रभाग रचना प्रसिध्द करण्यात आलेली नाही. तथापी काही समाज घटकांकडून विविध समाज माध्यमांद्वारे कल्याण डोंबिवली महानगरपालिका, सार्वत्रिक निवडणुक संभाव्य प्रभाग रचना असा मजकूर व्हायरल करण्यात आला आहे. 

त्यामुळे महापालिका क्षेत्रातील सुजाण नागरीकांमध्ये अफवा गैरसमज पसरविले जात आहेत. महापालिका प्रशासनाकडून अधिकृतरित्या स्पष्ट करणेत येत आहे की, प्रसारीत झालेला मजकूर हा पूर्णतः खोटा असुन, त्याचा महापालिकेशी काहीही सबंध नाही. त्यावर नागरीकांनी विश्वास ठेऊ नये. समाज माध्यमाद्वारे अथवा इतर मार्गाने कल्याण डोंबिवली महानगरपालिका येत्या सार्वत्रिक निवडणुक प्रभाग रचनेसंदर्भात अफवा पसरविणाऱ्या विरुध्द कायदयातील तरतूदी व भारतीय दंड संहितेच्या कलमान्वये कारवाई करण्यात येईल असा इशारा केडीएमसी उपायुक्त रमेश मिसाळ यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे दिला आहे.


Post a Comment

0 Comments