ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
पत्रकार अजय शेलार यांनी दिलेल्या तक्रारीनंतर कल्याण तालुका पोलीस ठाण्यात पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा कल्याण तालुका पोलिस ठाण्यात या कायद्यांतर्गत नोंदविण्यात आलेला पहिलाच गुन्हा ठरला आहे.
१८ जून २०२५ रोजी शेलार यांनी "सरकारी मातीची खासगी विक्री" हि बातमी केली होती. त्यानंतर संदीप नाईक या इसमाने २७ जून रोजी फेसबुक लाईव्ह करून आपल्या सहकार्यांसमवेत शेलार यांना धमकी दिली, तसेच समाजमाध्यमांवर त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला होता. शेलार यांनी यासंदर्भात टिटवाळा येथील कल्याण तालुका पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलीस प्रशासनाने तातडीने कारवाई करत, पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यात संदीप नाईक, आनंद कोल्हे व राजेश जाधव हे तिघे आरोपी आहेत. या प्रकरणाची माहिती गृह राज्यमंत्री, ठाणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्याकडेही देण्यात आली आहे.
Post a Comment
0 Comments