Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने कल्याण कोर्टाचे कामकाज सुरु होते अंधारात

                   ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

कल्याण कोर्टात जवळपास सहा तास विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने कोर्टाचे कामकाज अंधारात सुरु होते. कोर्टातील जनरेटर मेंटनन्स नसल्याने काही वर्षापासून बंद असून जनरेटरचे इंधन कोणी भरायचा यामुळे जनरेटर भंगारात पडून आहे. याची उच्च स्तरीय चौकशी झाली पाहिजे. कोर्टाचा वीज पुरवठा सुरळित असला पाहिजे अशी मागणी कल्याण जिल्हा न्यायालय वकील संघटना अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश जगताप यांनी केली आहे.

कल्याण येथील न्यायालयात सध्या एक विचित्र पण अत्यंत गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. संपूर्ण न्यायालय वीजविना काम करत असून जवळपास 3,500 वकील कार्यरत असलेल्या या महत्त्वाच्या न्यायालयात तब्बल 21 न्यायदान कक्ष असूनही, विजेचा पुरवठा नसल्यामुळे संपूर्ण यंत्रणाच ठप्प झाली होती. 10-12 वर्षांपूर्वी मिळालेला जनरेटर आज पूर्णतः निष्क्रिय आहे. "पेट्रोल किंवा डिझेल कोणी टाकायचे?" या जबाबदारीच्या अभावामुळे तो जनरेटर सडत पडला आहे. ना कोणी देखभाल केली, ना कोणी यंत्रणा उभी केली, आणि आता न्यायालय अंधारात आहे.

      अशा परिस्थितीत पक्षकारांना न्याय कसा मिळणार? वकिलांनी मोबाईलच्या टॉर्चच्या उजेडात आपले युक्तिवाद करायचे? आणि न्यायाधीशांनी ते ऐकायचेही त्या अंधारातच? त्यामुळे तात्काळ वीज पुरवठा सुरळीत करावा. जनरेटरला इंधन पुरवठा यंत्रणा उभी करावी. न्यायालयासाठी स्वतंत्र इन्फ्रास्ट्रक्चर फंड निर्माण करावा. या गंभीर परिस्थितीची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी कल्याण जिल्हा न्यायालय वकील संघटना  अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश जगताप यांनी केली आहे. 

Post a Comment

0 Comments