Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते कल्याणमध्ये संगणक व टॅबचे वाटप

                   ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी आज कल्याण तालुक्याचा दौरा केला. त्यावेळी उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये आयोजित कार्यक्रमात आय.डी.बी.आय. बँक लिमिटेड यांच्या सी.एस.आर. निधीतून कल्याण तालुक्यातील काही शाळांना व शासकीय रुग्णालयांना संगणक, प्रिंटर्स व टॅब्सचे वाटप करण्यात आले. बँकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले. 




यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, अपर जिल्हाधिकारी हरिष पाटील, पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, उपविभागीय अधिकारी विश्वास गुजर, आय.डी.बी.आय. बँकेचे मुख्य व्यवस्थापक रंजनकुमार रथ, ठाणे विभाग व्यवस्थापक रंजन कन्हैया तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

उपविभागीय अधिकारी कल्याण कार्यालयाचे केलेल्या नुतनीकरणाची त्यांनी पाहणी करुन समाधान व्यक्त केले. तसेच कार्यालयीन अधिकारी-कर्मचारी यांच्या कामाबाबत समाधान व्यक्त करुन निरंतरपणे लोकहितार्थ सेवा देण्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यालयाच्या आवारात वृक्षारोपण देखील करण्यात आले. मान्यवरांनी कल्याण तहसिल कार्यालयास देखील भेट दिली.

Post a Comment

0 Comments