Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कल्याणमध्ये परप्रांतीयाची मराठी रिसेप्शनिस्ट तरुणीला बेदम मारहाण

 

                     ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

कल्याणमध्ये एका खासगी रुग्णालयात मराठी रिसेप्शनिस्ट तरुणीला परप्रांतीय तरुणाकडून बेदम मारहाण झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. हि मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोपाल झा असे आरोपीचे नाव असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

नांदिवलीतील एका खासगी रुग्णालयात पीडित तरुणी ही रिसेप्शनिस्ट म्हणून काम करते. गोपाल झा हा परप्रांतीय तरुण डॉक्टरांना भेटायला आला होता. यावेळी डॉक्टरांच्या केबिनमध्ये आधीच एमआर बसले होते. त्यामुळे डॉक्टरकडे एमआर बसले आहेत, तुम्ही जरा थांबा असे तरुणी आरोपीला बोलली. यानंतर गोपालने तिच्याशी वाद घालायला सुरवात केली. यानंतर तरुणीच्या अंगावर धावून येत तिला लाथ मारली. यामुळे तरुणी खाली पडली. आरोपीने तिच्या केसांना धरून तिला फरफटत नेत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी मानपाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांनी दिली.

तर घडलेली घटना निंदनीय आहे.  आरोपीला पोलिसांच्या स्वाधीन करण्याआधी जनतेने प्रसाद द्यायला पाहिजे. महिलांशी मुलींशी कसं वागलं पाहिजे याची शिकवणूक आरोपीला दिली पाहिजे. याबाबत पोलिसांची भेट घेऊन योग्य कलमे लावण्याची मागणी करत आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी करणार असल्याची प्रतिक्रिया भाजपाचे माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर यांनी दिली. 


Post a Comment

0 Comments