आमच्यासोबत नाही खेदाची बाब
- भाजप दिवा शहर मंडळाचे अध्यक्ष सचिन भोईर
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
दिव्यातील फेरीवाल्याविरोधात भाजपने गुरुवारी जनआंदोलन करत तब्बल पाऊण तास रास्ता रोको केला. वारंवार ठाणे महापालिका प्रशासनाकडे फेरीवाला मुक्त दिवा आणि रस्ते करण्यासाठी ठोस कारवाई करा अशी मागणी केली होती, मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर दिव्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करत रास्ता रोको केला. तब्बल पाऊण तास दिवा चौकात हा रास्ता केल्याने दिवा - अगासन रोड आणि दिवा- खार्डी रोड या दोन्ही रस्त्यावर प्रचंड ट्रॅफिक जाम झाले. दरम्यान यावेळी पोलिसांनी मात्र बघायची भूमिका घेतली. या रास्ता रोकोत भाजप नेते संजय वाघुले, शिवाजी आव्हाड, नंदू परब, सचिन भोईर, विजय भोईर, सपना भगत, सीमा भगत आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
तर या आंदोलना बाबत भाजप दिवा शहर मंडळाचे अध्यक्ष सचिन भोईर यांनी सांगितले की, स्टेशन बाहेर मोठ्या प्रमाणात फेरीवाले बसत असतात, त्यामुळे रोज ट्रॅफिक जाम होते आणि याचा फटका दिवेकरांना बसतोय. पालिका प्रशासनाकडे तक्रार करून सुद्धा ते दुर्लक्ष करत आहेत, त्यामुळे आम्हाला आंदोलन आणि रास्ता रोको करायला लागला. तसेच यावेळी भोईर यांनी सत्ताधारी शिवसेनेला टोला हाणला आणि सांगितले की मित्र पक्ष असून सुद्धा तो आमच्यासोबत नाही हि खेदाची बाब आहे. आज आम्ही दिवा वासियांसाठी लढत आहोत आणि जोपर्यंत फेरीवाला मुक्त शहर करणार नाही, तोपर्यंत हा लढा चालू राहील, असे भोईर यांनी सांगितले.
.jpg)

Post a Comment
0 Comments