आम्ही नगरकर प्रतिष्ठानच्या मागणीची
घेतली दखल
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
आम्ही नगरकर प्रतिष्ठानच्या मागणीची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने दखल घेतली असून, माळशेज घाटात संरक्षक भिंतींवर रिफ्लेक्टर लावण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाकडे आम्ही नगरकर प्रतिष्ठानच्या वतीने माळशेज घाटात पावसाळ्यात धुक्यामुळे नागरीकांना गाडी चालवताना अडथळा येत होता. रस्ताचा बाजूला खोल दरी असल्याने वाहनचालक हे अंदाजावर गाडी चालवत असत, यामुळे अपघात होऊन मनुष्यहानी होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. याबाबत आम्ही नगरकर प्रतिष्ठान वतीने कार्याध्यक्ष बजरंग तांगडकर यांनी माळशेज घाटात रिफ्लेक्टर लावण्यासाठी मागणी केली होती.

याबाबत तातडीने याची दखल घेत राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी कार्यकारी अभियंता ज्योती शिंदे, उपविभागीय अभियंता धनाजी टिळे, शाखा अभियंता मितेश पालशेतकर अभियंता, कर्मचारी व कामगार यांनी तातडीने दखल घेत घाटात वारा, पाऊस, जंगली प्राणी, दरड कोसळण्याची भिती न बाळगता सातत्याने काम सुरू ठेवले असून. आम्ही नगर प्रतिष्ठान वतीने अधिकारी कर्मचारी वर्गाचे धन्यवाद देत आभार मानले.
.jpg)

Post a Comment
0 Comments