Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

पलावा पुलाच्या बांधकामावरून राजकारण तापले

 

                    ब्लॅक अँड व्हाईट डोंबिवली वार्ताहर 

कल्याण शिळफाटा रस्त्यावरील काटई निळजे रेल्वे उड्डाण पुलाचे शुक्रवारी सकाळी घाईघाईने शिंदे शिवसेनेचे आमदार राजेश मोरे आणि शिवसैनिकांनी घाईघाईत उद्घाटन करून पूल प्रवाशांसाठी खुला केला.

नव्या पुलावरील रस्त्यावर डांबर, सीमेंट आणि रसायन मिश्रणाचा (मास्टेक अस्फाल्ट) विशिष्ट थर पसरविण्याचे बाकी असताना पुलाचे उद्घाटन केल्याने काटई निळजे रेल्वे उड्डाण पुलावर प्रवाशांना आता थरारक अनुभव येत आहेत.पुलाचे उद्गाटन केल्यानंतर पहिल्या अर्ध्या तासात दोन ते तीन दुचाकी स्वार घसरून पडले. उद्घाटन होत असताना एक दुचाकी स्वार सर्व उपस्थित पाहुण्यांच्या समोर पडला. त्याचे गांभीर्य लक्षात न आल्याने उद्घाटनानंतर आमदार राजेश मोरे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे आणि इतर पदाधिकारी निघून गेले.

 या पुलाचे स्थापत्य काम पूर्ण झाले असले तरी पुलावर वाहनांची चाके घसरू नयेत म्हणून विशिष्ट रसायन मिश्रित (मास्टेक अस्फाल्ट) एक थर पुलावरील रस्त्यावर टाकला जातो. वाहन या गुळगुळीत रस्त्यावर समतलपणे धावतात. सर्व पुलावर हेच मिश्रण वापरले जाते, असे रस्ते बांधकाम क्षेत्रातील एका जाणकाराने सांगितले.

कल्याण-कल्याण शीळ रोडवर असलेल्या नवीन पलावा पूलावरुन राजकारण चांगलेच तापले आहे. मनसे आमदार राजू पाटील यांनी सोमवारी पलावा पूलाची पाहणी केली. यावेळी त्यांनी पुलाच्या कामात काय त्रुटी आहेत हे दाखवून दिले.ह्या नवीन पलावा पुलाचे उद्घाटन व कामावरून कल्याण ग्रामीणचे आजी माजी आमदारांमध्ये राजकीय आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत.

"पलावा येथील दुसऱ्या पुलाची अलाइनमेंट का चेंज करण्यात आली" असा सवाल कल्याण ग्रामीणचे मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी केला.

विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना कल्याण ग्रामीणचे शिवसेना शिंदे गटाचे तत्कालीन आमदार राजेश मोरे म्हणाले, विरोधकांनी काय बोलायचे ते त्यांनी ठरवावे. पत्री पूल, माणकोली पूलाच्या नावाने देखील आमच्यावर खापर फोडले गेले. मात्र विकासाच्या मुद्यावर आम्ही पूढे जाणार.आम्ही काम करतो व आमचे काम बोलेल. लोकांना आम्ही काय देऊ शकतो यावर आमचे लक्ष आहे असे ते म्हणाले.

प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना माजी मनसे आमदार  राजू पाटील म्हणाले, "पुलाचे अजूनही काम सुरू आहे, ते पूर्ण झालेले नाही. ठेकेदाराने संबंधित प्रशासनाला हा पूल अद्याप हस्तांतरीत केलेला नाही. तरी देखील स्थानिक आमदारांनी घाईघाईने हा पूल वाहतुकीसाठी सुरू केला. आणि पुलावर काही अपघात झालेत."

"याप्रकरणी गुन्हे दाखल झाले पाहिजेत तसेच एसीबी कडे यांची तक्रार केली गेली पाहिजे" असे ते म्हणाले." या पुलाच्या गर्डर बसविण्याच्या कामाचे फटाके फोडून उत्साह करण्यात आला होता. मग पुलाच्या उद्घाटन प्रसंगी ते केले नसते का ? भीतीपोटी त्यांनी हा पूल सुरू केला."

"अत्यंत चुकीच्या पद्धतीने हे काम केले असल्याने याठीकाणी लोकांचे बळी जाऊ शकतात. त्यांनी लवकरात लवकर या पूलाची डागडुजी करावी अशी आमची मागणी असल्याचे" मनसेचे नेते राजू पाटील  यांनी सांगितले.तसेच दुसऱ्या अर्धवट पुलाची पाहणी करत ते म्हणाले, " या पुलाची अलायमेंट बदलण्यात आली आहे ती कशासाठी? हा सवाल देखील उपस्थित केला आहे. शिवसेना ठाकरे गटाने पुलावरील अपघात प्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. याविषयी माजी आमदार पाटील म्हणाले, "पोलिसांकडे तक्रार करण्याऐवजी एबीसीकडे याची तक्रार करायला हवी. याप्रकल्पात मोठया प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. ठेकेदाराची चाैकशी करण्यात यावी, तेव्हा या पूलाच्या कामातील भ्रष्टाचार बाहेर येईल. पोलिस या प्रकरणात केवळ ठेकेदाराला नोटिस देतील त्यातून काही साध्य होणार नाही याकडे पाटील यानी लक्ष वेधले आहे.

हा पूल झाला तो दुरुस्त होऊन सुरु होईल. याच पूलाची दुसऱ्या मार्गीकेची अलायमेंट बदलली आहे. त्याठिकाणी काम सुरु आहे. तिथे काही अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण ? असा सवाल पाटील यांनी उपस्थीत करीत याला आयुक्त देखील जबाबदार असतील असे भाष्य केले आहे. या पूलाच्या मार्गिकेसह दिवा पूलाची, मेट्रोची अलायमेंटही चेंज करण्यात आली आहे. बड्या बिल्डरांच्या हितासाठी ही अलायमेटं चेंज केली जात असल्याचा आरोप पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर केला आहे.

विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना कल्याण ग्रामीणचे शिवसेना शिंदे गटाचे तत्कालीन आमदार राजेश मोरे म्हणाले, विरोधकांनी काय बोलायचे ते त्यांनी ठरवावे. पत्री पूल, माणकोली पूलाच्या नावाने देखील आमच्यावर खापर फोडले गेले. मात्र विकासाच्या मुद्यावर आम्ही पूढे जाणार.आम्ही काम करतो व आमचे काम बोलेल. लोकांना आम्ही काय देऊ शकतो यावर आमचे लक्ष आहे असे ते म्हणाले.

Tags

Post a Comment

0 Comments