ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
आषाढी एकादशीच्या दिवशी, दत्त मंदिर, दत्त आळी, कल्याण येथे वारकरी प्रकाशन मुंबई यांच्या 'साहित्य दिंडी' या प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचे अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती कोकण प्रांत कार्याध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक प्रवीण देशमुख यांच्या शुभहस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध कादंबरीकार जनार्दन ओक, नामवंत कवी यशवंत वैद्य, स्वामी विवेकानंद संस्था पाली, शहापूर या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा प्रज्ञावंत साहित्यिक शारदासुत सुनील म्हसकर, श्रीदत्त साधक अरुण गर्गे, प्रसिद्ध कवयित्री नंदा कोकाटे तसेच 'साहित्य दिंडी' या काव्यसंग्रहाच्या सहसंपादिका अश्विनी म्हात्रे, राहुल मुंडे आणि 'आषाढी वारी पंढरीची' या काव्यसंग्रहाचे प्रकाशक सुमित हजारे, जगन गायकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी प्रवीण देशमुख, यशवंत वैद्य, सुनील म्हसकर, नंदा कोकाटे अशा नामवंत साहित्यिक व कवींनी तसेच अश्विनी म्हात्रे, यज्ञिका जगन गायकर, ॲड. प्रशांत दाबके, सौ. जोशी, सौ. कुल्लर यांनी आषाढी वारीवर आधारित विठुरायाचे व वारकऱ्यांचे गुणगान वर्णन करणाऱ्या आपल्या सुंदर सुंदर काव्यरचना ताल, सूर व लयीत उत्कृष्ट प्रकारे सादर केल्या.
पंढरपूरच्या विठुरायाच्या वारीवर आधारित महाराष्ट्रातील नामवंत ६२ कवींच्या अतिशय सुंदर अशा काव्यरचना असलेल्या 'साहित्य दिंडी' या काव्यसंग्रहाला गडचिरोली जिल्ह्यातील साहित्यिक व सामाजिक कार्यकर्त्या संगीता ठलाल यांनी छान प्रस्तावना लिहिली आहे.
यावेळी संपादक ॲड. उमाकांत मधुकर आदमाने (पुणे), प्रकाशक सुमित विलास हजारे (कल्याण) आणि कविवर्य रामचंद्र गुरव (पुणे) यांनी संकलन केलेल्या साहित्यरत्न प्रकाशन संस्था, मुंबई यांच्या 'आषाढी वारी पंढरीची' या ई-प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचे प्रकाशनही उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व निवेदन सुप्रसिद्ध सूत्रसंचालक व निवेदक सुनील म्हसकर यांनी अतिशय उत्तम प्रकारे केले.
Post a Comment
0 Comments