ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण डोंबिवली तसेच भिवंडी परिसरातील 10 ते 12 विद्यार्थिनींनी माजी नगरसेवक कुणाल पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात धाव घेत कल्याणच्या बी. के. बिर्ला कॉलेज मधील प्रवेशा बाबत समस्या व्यक्त केली होती. याबाबत कुणाल पाटील यांनी बिर्ला कॉलेज मध्ये जाऊन प्रिन्सिपल डॉ. अविनाश पाटील यांची दोन दिवसांपूर्वी भेट घेत विद्यार्थ्यांच्या कॉलेज प्रवेशाच्या समस्या मार्गी लावल्या.
विद्यार्थ्यांचे एडमिशन झाल्यावर कुणाल पाटील यांनी सेंच्युरी कंपनीचे चेअरमन डॉ. ओ. आर. चितलांगे यांची भेट घेत त्यांचे आभार मानले. यावेळी ओ. आर. चितलांगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत प्रत्येक महाविद्यालयात स्कॉलरशिपची सुविधा उपलब्ध असते त्याचे फॉर्म भरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना लाभ कसा घेता येईल याबाबत मार्गदर्शन केले. तसेच अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी कल्याण मधील विद्यार्थ्यांना बाहेर जावे लागते. विद्यार्थ्यांची हि समस्या लक्षात घेऊन आगामी काळात बिर्ला कॉलेजमध्ये अभियांत्रिकी विभाग सुरु करण्याचा मानस देखील त्यांनी व्यक्त केला. तर रखडलेले ऍडमिशन झाल्यामुळे विद्यार्थ्यांनी यासाठी कुणाल पाटील यांचे आभार मानले आहेत.
Post a Comment
0 Comments