ब्लॅक अँड व्हाईट अंबरनाथ वार्ताहर
आज दिनांक २५/०६/२०२५ रोजी अंबरनाथ नगरपरिषद येथे लाड समितीच्या शिफारशीनुसार सफाई कामगारांच्या वारसांना वारसा हक्क पध्दतीने नियुक्ती आदेश देण्यात आहे. सदर कार्यक्रमासाठी विद्यमान आमदार माननीय श्री. बालाजी किणीकर हे उपस्थित होते. तसेच शहरातील अनेक मान्यवर माजी उप नगराध्यक्ष अब्दुल भाई शेख ,माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, माजी नगराध्यक्ष प्रज्ञा बनसोडे,उपजिल्हाप्रमुख मीनलताई वाडेकर माजी शहरप्रमुख श्रीनिवास वाल्मिकी, माजी नगरसेवक , सुभाष साळुंखे, उमर इंजिनिअर,उमेश गुंजाळ, चंद्रकांत भोईर, शिवाजी गायकवाड तसेच महिला आघाडीच्या सुषमा रसाळ व मनीषा भोईर व तसेच नगरपालिकेच्या सर्व अधिकारी वर्ग यांच्या उपस्थितीत हे देखील उपस्थित होते. माननीय आमदार श्री. बालाजी किणीकर तसेच माननीय मुख्याधिकारी श्री. उमाकांत गायकवाड यांच्या हस्ते उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आले.
लाड समितीच्या शिफारशींच्या अनुषंगाने सफाई कामगारांच्या वारसा हक्काच्या अंमलबजावणी बाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दिनांक २४/०२/२०२३ *रोजीच्या शासन निर्णयान्वये सुधारीत तरतुदी करणेत आल्या. तसेच मा. उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठ येथील दिनांक ०८/०१/२०२५ रोजीच्या आदेशान्वये न्यायालयाने वरील शासन निर्णय तरतुदीनुसार कार्यवाही करून सफाई कामगारांच्या वारसा हक्काची अंमलबजावणी करणेबाबत निर्देश दिले. त्याअनुषंगाने अंबरनाथ नगरपरिषदेतील वारसा हक्काची प्राप्त प्रलंबित प्रकरणांची छाननि करून ५२ सफाई कामगार या पदावर नियुक्ती आदेश देण्यात आले.
Post a Comment
0 Comments