Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

उल्हास नदी खनन, उत्खनन व भराव प्रकरणी,सत्संग विहार प्रबंधन विरोधात आधी दंडात्मक प्रक्रिया आणि आता फौजदारी गुन्हा दाखल

               ब्लॅक अँड व्हाईट बदलापूर वार्ताहर 

बदलापुर पश्चिम पोलीस स्टेशन येथे २३८/२०२५ महाराष्ट्र जमीन महसुल संहीता १९६६ चे कलम ४८(७), आपत्ती व्यवस्थापन अधि २००५ कलम ५१ (ब), भारतीय न्याय संहीता २०२३ कलम २२३ अन्वये सत्संग विहार या संस्थेचे व्यवस्थापक भजनकुमार रॉय व ईतर सर्व पदाधिकारी यांचे विरोधात संत्सग विहार हेंद्रेपाडा, बदलापुर पश्मिच येथे मौजे कुळगांव सर्वे नं. ५६/२/३ व इतर १३ या जमिनीवरील सत्संग विहार, भारत कॉलेज या संस्थेचे व्यवस्थापक भजनकुमार रॉय व ईतर सर्व पदाधिकारी यांनी सदर संस्थचे जागेवरील मातीचे अनाधिकृत गौणखनीज उत्खनन करून मा. तहसिलदार यांचे आदेशाचे उल्लंघन करून नदीचा प्रवाह बदलला म्हणुन त्यांचे  विरुध्द महाराष्ट्र जमीन महसुल १९६६ चे कलम ४८ (७) मधील नुसार अनधिकृत उत्खनन व भराव केल्यामुळे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील ५१ (ब) तसेच भारतीय न्याय संहिता कलम २२३ च्या तरतुदीनुसार फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments