जिल्हा परिषदेत डॉ. गंगाधर परगे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण
ब्लॅक अँड व्हाईट ठाणे वार्ताहर
समाजसुधारक, सामाजिक न्यायाचा मूलभूत पाया रचणारे आणि बहुजन समाजाला शिक्षण, आरोग्य व हक्काचा वाटा मिळवून देणारे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने आज, दि. २६ जून, २०२५ रोजी जिल्हा परिषद, ठाणे अंतर्गत समाज कल्याण विभाग व आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने उत्साहात कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांच्या हस्ते शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमास समाज कल्याण विभाग व आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
शाहू महाराजांनी दिलेल्या शिक्षण, समानता, आरोग्यसेवा व सामाजिक समतेच्या विचारांचा पुरस्कार करत उपस्थितांनी त्यांचे विचार कृतीत उतरवण्याचा संकल्प घेतला. राजश्री शाहू महाराजांचा आदर्श आजही प्रत्येक प्रशासन व सेवकासाठी प्रेरणादायी आहे, असा सूर सर्व स्तरांतून व्यक्त करण्यात आला.
Post a Comment
0 Comments