Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कल्याणमध्ये ठाकरे गटातील अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

 
                    ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

कल्याण मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला खिंडार पडले असून पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. कल्याण पश्चिमचे शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते हा प्रवेश करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख अरविंद मोरे, शहर प्रमुख रवी पाटील, युवासेना महाराष्ट्र राज्य सह सचिव प्रतीक पेणकर,  युवा सेना शहर प्रमुख सुजित रोकडे यांच्यासह इतर अनेक पदाधिकारी उपस्थित होते. एकनाथ शिंदे यांच्या कार्यकौशल्यावर प्रभावित होऊन ठाकरे गटातील कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत असून आगामी काळात आणखी कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे आमदार विश्वनाथ  भोईर यांनी सांगितले.



आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींनी हळूहळू वेग घेतल्याचे दिसत आहे. त्याच एक भाग म्हणून कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेना जिल्हा चिटणीस उदय रकीबे, युवासेना विभाग अधिकारी भरत भाटी, युवासेना उपविभाग अधिकारी ऋषिकेश आव्हाड, रंजना सांगळे, कविता सांगळे, उज्वला सांगळे, अनिता बोधले, केतकी वैद्य, हर्षाली बोधके, प्रियांका सांगळे बैलबाजार प्रभाग क्रमांक 36 कार्यकर्ते, यांच्यासह युवासेना पदाधिकारी, महिला आघाडी कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला. 
 
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि युवा खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या विकासकामांनी प्रेरित होऊन या सर्वांनी पक्षप्रवेश केला आहे. निवडणुका आल्या म्हणून हे प्रवेश झालेले नसून आमच्या पक्षाच्या कार्यपद्धतीने प्रभावित होऊन हे पक्षप्रवेश सुरूच असल्याची प्रतिक्रिया आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी दिली. तर येत्या काळात अनेक मोठमोठाले पक्षप्रवेश येत्या काळात होणार असल्याचे सूचक वक्तव्यही आमदार भोईर यांनी यावेळी केले.

यावेळी आमदार विश्वनाथ भोईर, जिल्हाप्रमुख अरविंद मोरे , शहरप्रमुख रवी पाटील, उपनेत्या विजया पोटे, महिला जिल्हा संघटक छाया वाघमारे, महिला शहर संघटक  नेत्रा उगले, युवासेना महाराष्ट्र राज्य सहसचिव प्रतीक पेणकर, युवासेना भिवंडी लोकसभा विस्तारक सुजित डामरे, युवासेना शहर प्रमुक सुजित रोकडे, दिनेश निकम, शिवसेना विधानसभा सहसंघटक यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments