भाजपाचे माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे त्याची पत्नी माजी नगरसेविका कविता म्हात्रे या दोघा म्हात्रे दांपत्यानी भाजपाला दिली सोडचिठ्ठी
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
राज्यभरात आगामी पालिका निवडणुकांचे बिगुल वाजले असतानाच राज्यातील सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपा पक्षातील कल्याण डोंबिवली महानगर पालिकेतील भाजपाचे माजी स्थायी समिती सभापती माजी नगर सेवक विकास म्हात्रे व त्याची पत्नी माजी नगरसेविका कविता म्हात्रे या दोघा म्हात्रे दांपत्यानी भाजपा पक्षाचा सदय पदाचा राजीनामा भाजपा कल्याण जिल्हाध्यक्षा कडे देत भाजपाला सोड चिठ्ठी दिल्याने आगामी पालिका निवडणुकी पूर्वीच भाजपाला खिंडार पाडले असून येत्या काही रविवारी ते कोणत्या पक्षाचा झेंडा हाती घेणार ते स्पष्ट होईल .
येत्या काही महिन्यात राज्यभरातील महापालिका निवडणुकां होऊ घातल्या असल्याने निवडणुकीचे बिगुल वाजू लागले आहे.निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी अन्य पक्षातील लोकप्रतिनिधी,पदाधिकारी फोडण्यासाठी सर्वच पक्षातून सुरुवात केली जाणार आहे.
कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालथ होणार असल्याचे दिसून येत असतानाच गुरुवारी कल्याण डोंबिवली महानगर पालिकेतील भाजपाचे माजी स्थायी समिती सभापती व माजी नगर सेवक विकास म्हात्रे यांनी त्याची पत्नी माजी नगरसेविका कविता म्हात्रे यांच्या सह दोघा म्हात्रे दांपत्यानी भाजपा पक्षाच्या सदस्य पदाचा राजीनामा भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष यांना दिल्याची माहिती माजी नगर सेवक विकास म्हात्रे यांनी सांगितले.
डोंबिवली पश्चिमेकडील गरीबाचा वाडा व राजू नगर या दोन प्रभागात विकास म्हात्रे व त्याची पत्नी कविता म्हात्रे हे म्हात्रे दांपत्य भाजपा पक्षाचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. भाजपा पक्षाचे नगरसेवक असतानाही त्याच्या दोन्ही प्रभागातील विकास कामासाठी भाजपाचे आमदार तथा माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करूनही शासनाकडून निधी उपलब्ध करून मिळत नव्हता. मात्र त्यांच्या प्रभागाच्या आजुबाजूच्या भाजपाचे नगरसेवक नसलेल्या प्रभागात आमदार चव्हाण यांच्या कडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जात असल्याने दोन्ही प्रभागातील म्हात्रे यांच्या कार्यकर्त्या मध्ये व नागरिकांमध्ये नाराजगी पसरली होती.
राज्यात भाजपची सत्ता असताना तसेच स्थानिक आमदार भाजपाचे असताना प्रभागातील विकास कामांना निधी मिळत नसल्याने प्रभागातील विकास कामे केली जाणार कसे असा प्रश्न म्हात्रे यांना दोन्ही प्रभागातील मतदारांकडून विचारणा केली जात होती. त्यातच भाजपा पक्षाकडून म्हात्रे यांना स्थानिक पातळीवर जाणीव पूर्वक टाळत मानसन्मान दिला जात नसल्याने अखेरीस विकास म्हात्रे आणि त्यांच्या पत्नी कविता म्हात्रे या दोघांनी भाजपा पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेत भाजपा पक्षाच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला.
Post a Comment
0 Comments