Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती दिनी महापालिकेतर्फे अभिवादन

                ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

राजर्षि शाहू महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त आज महापालिकेतर्फे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. महापालिका मुख्यालयात महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी राजर्षि शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी उपस्थित माहिती व जनसंपर्क विभागाचे उपआयुक्त संजय जाधव, शिक्षणाधिकारी विजय सरकटे, माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सहा.आयुक्त चंद्रकांत जगताप, सुरक्षा अधिकारी भरत बुळे तसेच इतर कर्मचारी वर्ग यांनी देखील राजर्षि शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पसुमने अर्पण करून अभिवादन केले.

Post a Comment

0 Comments