Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

काटेमानिवली परिसरात अनधिकृत बांधकामांवर ड प्रभागामार्फत निष्कासनाची कारवाई

 

काटेमानिवली परिसरात अनधिकृत बांधकामांवर  ड प्रभागामार्फत  निष्कासनाची कारवाई

                  ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

कल्याण पूर्व,  काटेमानिवली परिसरात अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या बांधकामांवर काल  ड प्रभागामार्फत पोलीस बंदोबस्तात निष्कासन कारवाई करण्यात आली. या कारवाईत गणेश टेकडीवरील गणेश मंदिराजवळील अंदाजे २०x२० फुटांचे पत्रा शेड, १५x२० फुटांचे ताडपत्री शेड, बाथरूमचे वीट बांधकाम, तसेच गणेश टेकडीच्या पायथ्याशी बांधलेले अंदाजे १५x१५ फुटांचे प्रार्थना स्थळाचे मंडप बांधकाम यांचा समावेश होता. महापालिकेचे अधिकृत ठेकेदार, मनपा कर्मचारी व गॅस कटरच्या सहाय्याने हि कारवाई करण्यात आली.

कारवाईदरम्यान प्रार्थना स्थळातील हनुमान मूर्ती व इतर देवी-देवतांचे फोटो यांच्याशी संबंधित धार्मिक भावना दुखावणार नाही, याची विशेष दक्षता घेण्यात आली. उपस्थित पांडे यांच्या स्वाधीनतेने संबंधित मूर्ती व फोटो फ्रेम त्यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले. महापालिकेने कोणत्याही प्रकारचे सामान जप्त केलेल नाही. तसेच या ठिकाणी उभारलेल्या १५x१५ फुटांच्या झोपडीत एक कुटुंब वास्तव्यास असल्याचे निदर्शनास आले. सध्या पावसाचे वातावरण असल्यामुळे या झोपडीवरील कारवाई तात्पुरती स्थगित करण्यात आली असल्याची माहिती ड प्रभागाचे सहा. आयुक्त उमेश यमगर यांनी दिली.


Post a Comment

0 Comments