ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण मुरबाड नगर या राष्ट्रीय मार्गावरील रेल्वे क्राँसिंग शहाड पुलाच्या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे शहाड पूल वाहतूकीच्या वाहनासाठी खोळंबा मार्ग झाला आहे. शहाड उड्डाणपुलावर रस्त्यावर खड्डे पडल्याने याचा फटका वाहतूकीवर होत असून वाहने खड्यातून चालविताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत असून वाहन चालकांना वाहतूक कोंडीला सामोरे जाण्याची वेळ येत आहे.
कल्याणहून मुरबाड- नगरकडे जाण्यासाठी असलेल्या मार्गावरील शहाड उड्डाणपूल हा महत्त्वाचा दुवा आहे. येथील रेल्वे लाईनवर हा पूल बांधण्यात आला असून दरवर्षी पावसाळ्यात या पुलावरील रस्त्याची अक्षरशः चाळण होते. यंदाही तेच चित्र दिसत असून पुलावरील रस्त्यावर खड्याचे साम्राज्य पाहता संभाव्य अपघाताला निमंत्रण असे दिसून येत आहे आणि या उड्डाणपुलाच्या रस्त्याच्या सुरक्षा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
राष्ट्रीय महामार्गाचे ठाणे उपविभागाचे उपअभियंत्यांनी वेळीच पाहणी करून खड्डे प्रश्न मार्गी लावला पाहिजे ,अन्यथा परिणामी पुढील आणखी काही दिवस खड्ड्यांसोबतच वाहतूक कोंडीचाही त्रास नागरिकांना सहन करावा लागणार आहे.
तर याबाबत कार्यकारी अभियंता ज्योती शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला तरी फोन घेतला गेला नाही.
शहाड उड्डाणपूलावरील रस्त्याचे खड्डे तातडीने बुजवित वाहतूक सुरळीत पणे होईल ही मागणी यानिमित्ताने नागरिक, प्रवासी, वाहनचालक यांच्या कडून जोर धरू पाहत आहे.
.jpg)

Post a Comment
0 Comments