Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

नक्षत्र मेलेडीज प्रस्तुत कराओके गीतांचा सदाबहार कार्यक्रम नुकताच सर्वेश सभागृह येथे संपन्न झाला

                    ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

शालमिनी सुरेश पाटील यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं. या क्षेत्रात शालिनी पाटील यांच्या मागे ठामपणें उभी असणारे व्यक्ती म्हणजे सुरेश पाटील तीन वर्षापासून हा कार्यक्रम यशस्वी होत आहे विविध ख्यातनाम गायकांच्या सोबत विविध नवोदित कलाकारांनी या कार्यक्रमात भाग घेतला. शालिनी पाटील यांच्या नक्षत्र मेलेडीज च्या माध्यमातून नेहमीच असे विविध मनोरंजक कार्यक्रम आयोजित केले जातात आणि नवोदित कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं जातं. त्यांच्या या उपक्रमाला नेहमीच रसिकांची उस्फूर्त अशी दाद  मिळते. मात्र विविध कार्यक्रमातून त्यांच्या या आयोजनामागील हेतू ओळखता यंदा न भूतो न भविष्यती अशी प्रचंड गर्दी या कार्यक्रमासाठी झाली होती. कलाक्षेत्रातील विविध मान्यवर यावेळी या नवोदित कलाकारांच गीत ऐकण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रोत्यांच्या गर्दीने आणि त्यांनी दिलेल्या प्रतिसादाने हे सभागृह तुडुंब भरले होते. 

या प्रेक्षकांनी दिलेल्या प्रोत्साहन बद्दल शालीनी पाटील यांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

तर या क्षेत्रातील नामवंत कलाकारांनी शालीनी पाटील यांच्या या उपक्रमाची मनःपूर्वक स्तुती केली. 

अनेक कलाकारांनी ही त्यांच्या या उपक्रमाबद्दल व त्यातून नवोदिकांना प्राप्त झालेल्या व्यासपीठाबद्दल शालीनीताई यांचे आभार मानले. रविंद्र जाधव डोंबिवली

Post a Comment

0 Comments