Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कल्याण भाजपा सरचिटणीस महेश जाधव यांच्या वतीने दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा

कल्याण पश्चिमेतील रामदासवाडीत भाजपा तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा जाहीर सत्कार 

माजी केंद्रीय मंत्री कपील पाटील, माजी आमदार नरेंद्र पवार, माजी नगरसेवक व गटनेते वरुण पाटील.गिरीजा मिश्रा,निता देसले, समाजसेविका मिलन जाधव, यांच्या सह विध्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

              ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

कल्याण पश्चिमेतील रामदासवाडीत भाजपाचे माजी.नगरसेवक महेश जाधव यांच्या तर्फे परिसरातील दहावी बारावी परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा जाहीर सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.अशा प्रकारचा कार्यक्रम महेश जाधव यांच्या कडून गेली 11 वर्षे सातत्याने आयोजित करण्यात येत असतो.विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात कल्याण पश्चिम  रामदासवाडीतील माळी समाज हॉल इथे आयोजित करण्यात आला होता.



ह्या प्रसंगी विद्यार्थ्यांना सन्मानित करतांना शालेय उपयोगी वस्तूंचे वाटपही केले जाते.माजी केंद्रीय मंत्री कपील पाटील, माजी आमदार नरेंद्र पवार, माजी नगरसेवक व गटनेते वरुण पाटील.गिरीजा मिश्रा,निता देसले, समाजसेविका मिलन जाधव, यांच्या सह भाजपाचे अनेक पदाधिकारी आणि विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते,

मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित केले.

माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले, आपल्या कल्याण मधील विद्यार्थ्यांनी IPS आणि UPS सारख्या स्पर्धा परीक्षेत यशस्वी होऊन कल्याण शहराचे नाव सोनेरी अक्षरात नोंदवावे असेही सांगितले.आणि पुढील आयुष्यात यशस्वी वाटचाली साठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

 

Post a Comment

0 Comments