Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

भिसोळ येथे ६० निरंकारी भक्तांचे रक्तदान

 

                     ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

संत निरंकारी मिशनच्या संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन अंतर्गत आयोजित रक्तदान शिबिरात एकूण ६० युनिट्स रक्त जमा करण्यात आले.  रक्तदात्यांमध्ये  ४२ पुरुष तर १८ महिला होत्या. संत निरंकारी रक्त पेढीने रक्त संकलित केले. या शिबिराचे उद्दिष्ट गरजू रुग्णांसाठी रक्त संकलन करणे आणि रक्तदानाचे महत्त्व जनमानसात पोहोचवणे होते.

हे शिबिर रविवारी संत निरंकारी सत्संग भवन, भिसोळ, पांजरापोळ, तालुका - कल्याण येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात मिशनच्या भिसोळ व सावर्णे शाखेतील  रक्तदात्यांनी  उत्साहाने भाग घेतला. गोळा झालेले प्रत्येक युनिट रक्त एखाद्याच्या जीवनात बदल घडवू शकते. हे एक सुरक्षित आणि सोप्या प्रक्रियेचे कार्य आहे. या शिबिराचा शुभारंभ  कल्याण सेक्टर संयोजक जगन्नाथ म्हात्रे यांच्या उपस्थितीत सद्गुरू व निरंकार प्रभू चरणी प्रार्थना करून करण्यात आला.


स्थानिक भिसोळ शाखा मुखी अनंत भोईर आणि सावर्णे शाखा मुखी रघुनाथ खाकर यांच्या देखरेखीखाली सेवादल स्वयंसेवक व निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या स्वयंसेवकांच्या संयुक्त प्रयत्नातून यशस्वी रित्या हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून संत निरंकारी मिशन मानवतेचा संदेशही देत आहे की, "मानवतेचा करा सन्मान, रक्तदानाच्या माध्यमातून द्या जीवनदान."

Post a Comment

0 Comments