Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

नाले सफाई असमाधान कारक आढळुन आल्याने, ड प्रभागातील स्वच्छता अधिकारी निलंबित

 

    केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी केली कल्याण पूर्वेतील नाले सफाईची पाहणी 

                 ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 
कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी गुरुवारी दिवसभरात कल्याण पूर्वेतील जे आणि ड प्रभाग क्षेत्रातील नाले साफ-सफाई व परिसर स्वच्छतेची पाहणी केली. यावेळी शहर अभियंता अनिता परदेशी, अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, योगेश गोडसे, उपआयुक्त प्रसाद बोरकर, संजय जाधव, कार्यकारी अभियंता घन:श्याम नवांगुळ, मनोज सांगळे, जे प्रभागाचे सहा.आयुक्त सचिन तामखेडे, ड प्रभागाचे सहा.आयुक्त उमेश यमगर त्यांच्या समवेत उपस्थित होते.

जे प्रभागात आयुक्तांनी लोकग्राम व मंगलराघोनगर या परिसरातील मध्यम नाल्यांची साफ-सफाई व परिसर स्वच्छतेची पाहणी केली. या नाल्यांची 65-70 टक्के साफ-सफाई झाल्याची माहिती प्रभागाचे सहा.आयुक्त सचिन तामखेडे यांनी दिली. पुढील 8 दिवसात प्रभागातील सर्व नाल्यांची साफ-सफाई पुर्ण करण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच नाल्यातून काढलेला गाळ त्वरीत उचलण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

ड प्रभागात आयुक्तांनी विजयनगर नाका व तिसगाव पाडा या परिसरात प्रत्यक्ष भेट देवून नाले साफ-सफाई व परिसर स्वच्छतेची पाहणी केली. पाहणी दरम्यान काही ठिकाणी नाले सफाईचे काम असमाधानकारक असल्याचे निदर्शनास आल्यामुळे, ड प्रभागातील स्वच्छता अधिकारी राजेंद्र खैरे यांस निलंबित करण्यात आले.

नाले सफाई पाहणी पूर्वी महापालिका आयुक्त अभिनव आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली जे आणि ड प्रभागातील आपत्कालीन परिस्थितीतील पूर्व तयारीचा सविस्तर आढावा घेणेकामी, बैठक संपन्न झाली. या बैठकीत धोकादायक व अतिधोकादायक इमारतींची संख्या, त्या इमारतीतून रहिवास मुक्त केलेल्या कुंटूबांची संख्या तसेच अनधिकृत होर्डिग्ज विरोधातील कारवाई याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.


Post a Comment

0 Comments