Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी केली विजयनगर प्रभागातील विविध विकासकामांची पाहणी

 

                 ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

कल्याण पूर्वेतील विजयनगर – गवळी नगर प्रभागातील विविध प्रलंबित विकासकामांची नुकतीच पाहणी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी केली. या पाहणीवेळी महापालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी शिवसेना कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रशांत काळे व माजी नगरसेविका माधुरी काळे, उपस्थित होते.

या सदर दौऱ्यात आमराई, विजयनगर परिसरातील रस्ते, नाले, पथदिवे, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, गटारे अशा अनेक कामांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. कामांबाबत सविस्तर आढावा घेत आयुक्त गोयल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना प्रलंबित विकासकामे तातडीने युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. तसेच, आतापर्यंत पूर्ण झालेल्या कामांची माहिती अहवालाद्वारे सादर करावी  अशी सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिली. नागरिकांच्या मागण्या आणि परिसरातील समस्या लक्षात घेऊन महापालिकेच्या पातळीवर त्वरित कृती केली जाणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.


या दौऱ्यामुळे विजयनगर – गवळी नगर परिसरातील विकासकामांना नवी गती मिळणार असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेली कामे लवकरच पूर्णत्वास जाणार असल्याची आशा नागरिकांनी व्यक्त केली आहे. या दौऱ्याने प्रशासन आणि नागरिक यांच्यातील विश्वासात वृद्धी होणार असून, माजी नगरसेविका माधुरी काळे यांनी नागरिकांच्या प्रश्नांना महापालिकेकडे वेळोवेळी गांभीर्याने मांडल्यामुळे हा पुढाकार महत्त्वाचा ठरत आहे.


Post a Comment

0 Comments