अखेर......
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या
वारसांच्या जागेवरील
इमारत जमीनदोस्त
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वारसांच्या जागेवर दावडी येथे उभारलेली तळ अधिक आठ मजल्याची इमारत संपूर्ण जमीन दोस्त करण्यात आली. ही इमारत तोडण्यासाठी अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे व उपायुक्त अवधूत तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त भारत पवार यांच्या पथकाने हि कारवाई केली.
ही इमारत तोडण्यासाठी एकूण 23 दिवस लागले यामध्ये सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी ही काम चालू ठेवण्यात आले. तसेच ही इमारत तोडण्यासाठी एकूण सहा वेळा त्या भागातील संपूर्ण वीजपुरवठा खंडित करावा लागला. इमारत तोडण्याकरिता लागणारी मशीन हाय जो क्रशर ही मशीन मुख्य रस्त्यापासून इमारतीपर्यंत आणण्यासाठी खूपच कसरत करावी लागली. दावडी सर्कल ते निष्कासन ठिकाण यापर्यंत आणताना सर्व इलेक्ट्रिक वायरी केबल एसटीपी लाईन वायर इत्यादी 20 ते 25 फूट उंच कराव्या लागल्या त्यानंतर त्या मशीनचा बूम रस्त्यावर पोल वायरीला न लावता जागेवर घेण्यात आला.
इमारत तोडत असताना मशीन इन बॅलेन्स झाल्यामुळे जपान येथून तातडीने इंजिनियर्स बोलवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेटरने मशीन चालवली तसेच पाण्याची टाकी तोडण्यासाठी साधारण दीड मजले इतका उंच रॅम बनवण्यात आला ही इमारत तोडत असताना शेजारील इमारतीचे पार्किंग मधील सर्व पत्रे व शेड यांचे नुकसान झाले तसेच शेजारी असलेल्या हॉलचे गोडाऊन रिकामे करावे लागले. त्याचेही सर्व पत्रे इमारतीच्या स्लॅबचा भाग पडल्यामुळे तुटले गेले.
तसेच इमारती मागील काम चालू असलेल्या ठिकाणी लेबर साठी उभारलेल्या टेम्परवारी शेड यांचे नुकसान झाले. मशीन बाहेर काढताना काही केबल तोडाव्या लागल्या तसेच काही पाण्याच्या लाईन तुटल्या. ही कारवाई चालू असताना जागा मालकांनी बराच वेळा विरोध केला परंतु त्यांना योग्य तो समज देऊन काम चालू ठेवण्यात आले व अखेर संपूर्ण निष्कासन पूर्ण झाले असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी दिली.
.jpg)

Post a Comment
0 Comments