Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

मोहन्यातील लहुजी नगरात सार्वजनिक शौचालय नसल्याने नागरिकांचे हाल

 

स्मार्ट टॉयलेटचा गवगवा करीत

आंकाक्षी शौचालय उभारणाऱ्या केडीएमसी

 प्रशासन मोहने परिसरातील लहुजी नगर

 स्लम परिसरातील नागरी मुलभूत सुविधा

 प्रश्नाबाबत केडीएमसी प्रशासन उदासीन का?

                      ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

कल्याण डोंबिवली महानगरपालिका स्मार्ट सिटी कडे वाटचाल करीत असल्याचा गवागवा केला जात असला तरी मोहने येथील लहुजी नगर झोपडपट्टी वासियांना शौचालय सुविधा अभावी उघड्यावर प्रातविधी उरकावा लागत असल्याने शासनच्या हागणदारी मुक्त अभियनाला मनपा क्षेत्रात हरताळ बसत असल्याचे दिसते.  

    मोहने येथील लहुजी नगर झोपडपट्टी वजा वसाहतीमध्ये दोन हजार हून अधिक नागरिकांना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या भोंगळ कारभारामुळे उघड्यावर शौचालय करावयास जावे लागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत आणि घर घर शौचालय योजनेचा गाजावाजा करणाऱ्या सरकारच्या दाव्यांना लहुजी नगरमधील वस्तुस्थितीने चपराक दिली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत मोहन्यातील लहुजीनगर मधील तब्बल २,५०० नागरिकांचा संभाव्य  आरोग्याचा प्रश्न यानिमित्ताने ऐरणीवर आला आहे.  

 स्मार्ट टाँयेलटचा गवगवा करीत आंकाक्षी शौचालय उभारणाऱ्या केडीएमसी प्रशासन मोहने परिसरातील लहुजी नगर स्लम परिसरातील नागरी मुलभूत सुविधा प्रश्नाबाबत केडीएमसी प्रशासन उदासीन का?असा सवाल यानिमित्ताने होत आहे.                

        देश स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही आजही कल्याण डोंबिवली सारख्या स्मार्ट शहरात उघड्यावर शौचाला जाण्यास नागरिक मजबूर आहेत. विशेषतः महिलां वर्गाची यामुळे होणारी कुचंबणा आणि मानसिक त्रास ही आरोग्याच्या दृष्टीने गंभीर बाब ठरत आहे. लहुजी नगर मधील पूर्वीचे जुने शौचालयाची पडझड झाल्याने ते तोडण्यात आले. त्या जागी नवीन शौचालय बांधणे गरजेचे होते. परंतु कोणचं तरी चागंभल होण्यासाठी शौचलय बांधणे प्रश्न मार्गी लागत नाही, असाही आरोप यानिमित्ताने होत आहे. यापूर्वी सुलभ शौचालय दुमजली बांधण्याचे काम इमारत बांधून देखील न्यायलीन वादाच्या भोवर्यात सापडल्याने अद्याप देखील सुरू होऊ शकले नाही.  लहुजी नगर मधील करदाते नागरिक मनपाला मालमत्ता कर भरतात, त्यांच्या मुलभूत सुविधा पुरविणे मनपाचे काम असून , प्रशासनाचे या परिसरात दुर्लक्ष का? कोणच्या दबावामुळे नागरी सोयी सुविधा चा बोजावारा होत आहे, असाही आरोप यानिमित्ताने होत आहे.

  याबाबत माजी नगरसेवक दया शेट्टी यांनी खासदार सुरेश बाळ मामा म्हात्रे यांची भेट घेतली असून लहुजी नगरच्या शौचालयाचा प्रश्न सोडविण्यासाठी विनंती केली आहे.  लहुजी नगरच्या अडीच हजार हून अधिक लोकसंख्या असलेल्या विभागामध्ये जर एकही शौचालय नसेल तर नागरिकांनी जायचे कुठे पालिका नागरिकांना घनकचरा व्यवस्थापनाच्या नावाखाली तीनशे रुपयांची वाढ केली असून त्या पैशाचं पालिका काय करते नागरिकांना साधे शौचालय उपलब्ध नसणे ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे असे दया शेट्टी यांनी सांगितले.


Post a Comment

0 Comments