Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

सप्तशृंगी इमारत दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द आमदार सुलभा गायकवाड यांच्या हस्ते देण्यात आली मदत


सप्तशृंगी इमारत दुर्घटनेतील मृतांच्या

कुटुंबीयांना आ. सुलभा गायकवाड यांच्या हस्ते पाच लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द

                  ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

महिनाभरापूर्वी कल्याण पूर्व येथील सप्तशृंगी इमारत कोसळण्याची घटना घडली होती. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेत मृत झालेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत मिळावी यासाठी आमदार सुलभा गायकवाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला होता.  आज हे पाच लाख रुपयांचे धनादेश तहसीलदारांकडे प्राप्त झाले असता तहसीलदारांनी हे धनादेश आमदार सुलभा गायकवाड यांच्या हस्ते मृतांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द केले आहेत.

तर याबाबत बोलताना आमदार सुलभा गायकवाड यांनी सांगितले की, संकटाच्या काळात सरकारची साथ कायम असून २० मे रोजी कल्याण पूर्वेतील चिकणीपाडा येथे घडलेल्या दुर्दैवी इमारत दुर्घटनेत सहा निरपराध नागरिकांचा दु:खद मृत्यू झाला. या दु:खद प्रसंगी मयत व्यक्तींच्या कुटुंबीयांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मंजूर झालेली प्रत्येकी ₹५ लाख रुपयांची मदत आज  आमदारांच्या जनसंपर्क कार्यालयात, ग्राम महसूल अधिकारी धनश्री जाधव यांच्या उपस्थितीत संबंधित कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आली.

या तत्पर मदतीसाठी  मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस, ठाणे जिल्हाधिकारी  अशोक शिनगारे आणि तहसीलदार  सचिन शेजाळ यांचे  आभार मानत आपत्तीमधील आधार हीच खरी लोकसेवा असल्याचे आमदार सुलभा गायकवाड यांनी सांगितले.


Post a Comment

0 Comments