सहाय्यक आयुक्त आणि सुरक्षा बलाच्या
महिलेवर हल्ला
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या फेरीवाला कारवाई पथक शुक्रवारी सायंकाळी स्टेशन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते स्टेशन रोड कारवाई करण्यासाठी गेले असता. संतप्त फेरीवाल्यांनी कारवाई पथकाला जोरदार विरोध करत जप्त केलेला माल आम्हाला परत द्या, अशी मागणी करत फेरीवाला पथकाचा पाठलाग केला. यात फेरीवाला हटाव पथक आणि फेरीवाले यांच्यात तु तु मै मै झाली.
प्राप्त माहिती नुसार, "क" प्रभागाचे सहाय्यक आयुक्त धनंजय थोरात यांच्या फेरीवाला हटाव पथकाने कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते कल्याण स्टेशन रोड, स्काँय वाँक परिसरात फेरीवाला हटाव कारवाई केली. स्काँय वाँक कारवाई नंतर परत आलेल्या फेरीवाला हटाव पथकास परत फेरीवाले फुटपाथ व्यापत आपले बस्तान मांडलेले दिसल्याने, फेरीवाला हटाव पथकाने फेरीवाल्यांवर जप्तीची कारवाई सुरू केली. या कारवाईत काही महिला फेरीवाल्यांनी आमाच्या मालाचे नुकसान केले, अशी आरोड करीत तु तु मै, मै केली आणि आरेरावी करीत महिला सुरक्षा बलाच्या कर्मचारी व आधिकारी यांच्यावर धावून जात आक्रमक पवित्रा घेतला.
या संदर्भात सहाय्यक आयुक्त धनंजय थोरात यांनी कारवाईला विरोध करणाऱ्या, तसेच फेरीवाला हटाव पथकाच्या कर्मचाऱ्यांच्या आंगावर धावून जाणाऱ्या फेरीवाल्या विरोधात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू केली. प्रशासनाच्या कारवाई बडग्यामुळे संतप्त फेरीवाल्यांनी महापालिकेचे मुख्यालय गाठले. सुरक्षारक्षकाने प्रवेश द्वार बंद केल्याने. संतप्त फेरीवाले प्रवेशद्वारा बाहेर जमले. आमचा जप्त केलेला माल परत केला नाही तर आम्ही याच ठिकाणी आमच्या जीवाचे बरे वाईट करून घेऊ असा इशारा दिला. कारवाई पथकाने आमचा माल जप्त करून आम्हाला मारहाण केल्याचा आरोप फेरीवाल्यांनी करीत गदारोळ घातला,असेही समजते.
स्टेशन परिसरातील 150 मीटर परिसर फेरीवाला मुक्त परिसर असावा, असेही असताना फेरीवाला हटाव पथकाने कारवाई चा बडगा उगारला तरी समस्या कायम असल्याचे दिसून येत आहे. स्टेशन परिसरातील रस्त्यालगत पार्क केलेल्या दुचाकी, फेरीवाला बस्तान आणि या सर्वातून अडथळ्यांची शर्यत पार करीत ये जा करणार्या पादचाऱ्यांना कधी, कसा दिलसा मिळेल हे चित्र बदलणार कधी असा सवाल यानिमित्ताने उभा ठाकला आहे.
.jpg)


Post a Comment
0 Comments