ठाकरे बंधुंच्या मोर्च्याआधीच फडणवीसांची गुगली
मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली. या बैठकीत त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी पहिलीपासून तीन भाषा धोरण लागू करण्याबाबत माशेलकर पॅनेलच्या सूचना स्वीकारल्या होत्या.
ब्लॅक अँड व्हाईट मुंबई वृत्तसेवा
तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषेचा निर्णय अखेर महायुती सरकारने रद्द केला आहे. वाढता विरोध आणि संभाव्य मोर्चे तसेच निदर्शने लक्षात घेऊन हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांत ठाकरे गट, मराठी संघटना आणि जनतेमधून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
विशेषतः ५ जुलै रोजी ठाकरे बंधूंकडून हिंदी सक्तीविरोधी मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली होती. त्याआधीच सरकारने यावर पुनर्विचार करत निर्णय रद्द केल्याची घोषणा केली.
आज महायुतीच्या मंत्रिमंडळाची मंत्रिमंडळ बैठक पार पडली. महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हिंदी सक्तीच्या प्रस्तावावर चर्चा झाली. त्यानंतर सरकारी स्तरावर जीआर रद्द करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात काल रात्री सुमारे १५ मिनिटे याबाबत चर्चा झाली होती.
विविध संघटनांनी आणि राजकीय पक्षांनी हिंदी सक्तीच्या निर्णयाला विरोध दर्शवला होता. अनेकांनी हा निर्णय मराठी भाषेवर अन्यायकारक असल्याचा आरोप केला. तसेच ठाकरे बंधू (उद्धव आणि आदित्य ठाकरे) ५ जुलै रोजी मोर्चा काढणार होते. मात्र सरकारने याआधीच निर्णय मागे घेतला आहे. महाराष्ट्र सरकारने त्रिभाषा धोरणावरील जीआर रद्द केले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाषा सूत्र अंमलबजावणीसाठी समितीची घोषणा केली आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली. या बैठकीत त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी पहिलीपासून तीन भाषा धोरण लागू करण्याबाबत माशेलकर पॅनेलच्या सूचना स्वीकारल्या होत्या.
========================================
मराठी जनांचं अभिनंदन..... राज ठाकरे
"हा निर्णय कायमचा रद्द झाला आहे असं आम्ही गृहीत धरतोय आणि महाराष्ट्रातील जनतेने पण हेच गृहीत धरलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा समितीच्या अहवालाचा घोळ घालू नका, अन्यथा या समितीला महाराष्ट्रात काम करू दिलं जाणार नाही याची नोंद सरकारने घ्यावी". "आता मराठी माणसाने पण यातून बोध घ्यायला हवा. तुमच्या अस्तित्वाला, तुमच्या भाषेला नख लावायला आपलेच लोकं बसलेत आणि त्यांच्यासाठी ते ज्या भाषेत शिकले, वाढले, जी भाषा त्यांची ओळख आहे त्याच्याशी काही देणंघेणं नाहीये... त्यांना कोणालातरी खुश करायचं आहे बहुदा. यावेळेस मराठी मनांचा एकत्रित राग दिसला तो पुन्हा पुन्हा दिसला पाहिजे." "असो, पण भाषेसाठी मराठी माणसं एकवटताना दिसली हा आनंद आहे. हा कडवटपणा अधिक वृद्धिंगत होऊ दे, आणि मराठी भाषा ज्ञानाची आणि जागतिक व्यवहाराची भाषा होऊ दे हीच इच्छा." मराठी जनांचं पुन्हा एकदा अभिनंदन.
मराठी माणसाची एकजूट कायम, ५ जुलैला कार्यक्रम होणारच
"एखादे संकट आल्यानंतर मराठी माणूस जागा होतो. पण आता आपण जागे झालोय, एकत्र आलोय. आता मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून हिंदीचा जीआर मागे घेतला गेला. पण आता मराठी माणसाची ही एकजूट कायम राहावी असं उद्धव ठाकरे म्हणाले. हिंदीच्या विरोधात आम्ही ५ जुलैला मोर्चा काढणार होतो. पण तो मोर्चा आता रद्द झाला तरी त्या दिवशी विजयी मोर्चा काढायचा की आणखी काही कार्यक्रम करायचा यावर चर्चा करू. या संदर्भात ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला त्यांच्यांशी चर्चा करणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले."
Post a Comment
0 Comments