18 जागांपैकी 15 जागांवर महायुती विजयी 2 महाविकास आघाडी तर 1 अपक्ष
मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. 90.37% निवडणुकीतील मतदान
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत बाजार समितीवर महायुतीचा झेंडा फडकला असून एकूण 18 जागांपैकी 15 जागा महायुतीच्या कोट्यात पडल्या असून 2 जागांवर महाविकास आघाडी तर एक जागा अपक्ष उमेदवाराला मिळाली असल्यामुळे कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीवर मतदात्यांनी महायुतीला एक हाती सत्ता देऊन आपला विश्वास दाखविला.
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल शनिवारी रात्री उशिरापर्यंत जाहीर करण्यात आला. निवडणुकीत पार पडलेल्या मतदान प्रक्रियेला मतदारांनी भरभरून प्रतिसाद दिला. शनिवारी सकाळी सात वाजता मतदानासाठी मोठी गर्दी केली होती. तर सायंकाळी पाच पर्यंत मतदानाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एकूण मतदानाच्या 90.37% मतदानाची नोंद करण्यात आली. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत 2358 मतदारांपैकी तब्बल 2131 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला, यामध्ये महिलांचा सहभागही लक्षणीय होता.
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांपैकी एकूण 17 जागांसाठी हे मतदान झाले असून एक उमेदवार बिनविरोध निवडून आला. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत 155 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यापैकी 15 अर्ज बाद असून प्रत्यक्षात निवडणुकीच्या रिंगणात 51 उमेदवारांनी आपले नशीब आजमावले होते.
या निवडणुकीत विजयी उमेदवार रवींद्र घोडविंदे, कपिल थळे, भरत गोंधळे, योगेश धुमाळ, अरुण पाटील, जालिंदर पाटील, मनोहर पाटील, विद्या पाटील, शारदा पाटील, वसंत लोणे, रवींद्र आव्हाड, नरेश सुरोशी, रवींद्र भोईर, किशोर वाडेकर, विजय सुरोशी, काशिनाथ नरवडे आणि गिरीश पाटील हे उमेदवार प्रत्यक्षात निवडणूक लढवून जिंकले असून हमाल व तोलाई गटातील शंकर आव्हाड हे बिनविरोध निवडून आले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विशाल जाधवर यांनी दिली.
Post a Comment
0 Comments