Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

पोलीसांनी शहानिशा केल्याशिवाय विनयभंगाचे गुन्हे दाखल करू नये - आमदार विश्वनाथ भोईर

 

 पोलिसांच्या कार्यपद्धतीवर शंका


गुन्हा दाखल करणाऱ्या महिलेची देखील

चौकशी करण्याची केली मागणी


               ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

कल्याणमध्ये शिवसेना शिंदेगटातील माजी नगरसेवक मोहन उगलेयांच्यावर झालेल्या विनयभंगाच्या आरोपानंतर राजकीय वातावरण तापलं आहे.  या प्रकरणात मोहन उगलेयांची प्रतिमा धुळीस मिळवण्यासाठी त्यांना सॉफ्ट टारगेट केलं जात असल्याचा आरोप खुद्द कल्याण पश्चिम शिवसेना शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर  यांनी पत्रकार परिषदेत केला.

 ज्या महिलेनं ही तक्रार केलीती कधीही मोहन उगलेना भेटलेली नाही, ना त्यांच्यात फोनवर संवाद झालेला आहे.  मग विनयभंग कसा आणि कुठे झालापोलिसांनी आधी शहानिशा करून गुन्हा दाखल करायला हवा होताजर मोहन उगलेदोषी ठरले तर पक्षातून हकालपट्टी करुपण जर आरोप खोटे ठरलेतर अशा महिलांवर कठोर कारवाई झाली पाहिजे.  पोलिसांनी सामान्य महिलांच्या तक्रारींवर कारवाईसाठी दहा-दहा दिवस लावले जातातपण प्रतिष्ठित नगरसेवकांवर काही तासांत गुन्हा दाखल होतोही दुजाभावाची वागणूक काअसा सवालही आमदार विश्वनाथ भोईर यांनी केला.

 याशिवाय या प्रकरणाची माहिती लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेयांच्यापर्यंत पोहोचवणार असल्याचंही आमदार विश्वनाथ भोईर यांनी स्पष्ट केलं आहे. तर राजकीय आकसापोटी आपल्यावर असे गुन्हे दाखल केले जात असून येथील चार प्रभागात माझे काम चांगले आहे. निवडणुकीत मला हरवणे विरोधकांना जमत नसल्याने महिलांना पुढे करून अशाप्रकारे आपल्यावर खोटे गुन्हे दाखल करत असल्याची प्रतिक्रिया माजी नगरसेवक मोहन उगले यांनी दिली.  


Post a Comment

0 Comments