७८ वर्षांपासून अखंड प्रज्वलित ज्योतला वर्ल्डवाइड बुक ऑफ रेकॉर्ड आणि आयडियल इंडियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवण्याचा संकल्प साधकांनी केला..
ब्लॅक अँड व्हाईट उल्हासनगर वार्ताहर
झुलेलाल श्री अमर उडेरोलाल यांचा जन्म विक्रम संवत १००७ मध्ये चैत्र महिन्याच्या चंद्रदर्शन शुक्रवारी सिंध प्रांतातील नसरपूरच्या ठट शहरात सूर्यवंशी रतनराय यांच्या घरी माता देवकीच्या गर्भात झाला, पिता रतनराय यांना कोडन आणि हरचंदराय नावाचे दोन पुत्र होते तिसरे पुत्र म्हणून झुलेलाल भगवान अवतरले त्यांच्या जन्माचे नाव उदयचंद होते, त्यांना नंतर उडेरोलाल, वरुण देव, जिंदाहपीर, झुलेलाल या नावाने ओळखले जाऊ लागले.
उडेरोलाल यांनी आपले चुलत भाऊ ठाकूर संत पुगरदेव जी यांना जल आणि ज्योतीचे महत्त्व समजावून सांगून आपली गादी सोपवली आणि म्हटले की जिथे जल आणि ज्योत आहे तिथे माझा वास आहे.
१९४७ मध्ये ठाकूर पुगरदेव जी यांचे गादीनशीन २४ वे वंशज परम पूज्य ठाकूर साई आसनलाल साहिब जी यांनी १०६२ वर्षांपासून उडेरोलाल मंदिर सिंधमध्ये ठाकूर पुगर देव यांनी प्रज्वलित अखंड ज्योतीतून ज्योत प्रज्वलित करून गुजरात राज्याच्या भरूच शहरात माँ नर्मदा नदीच्या काठावर श्री झूलेलाल वरुणदेव मंदिराचे निर्माण केले आणि त्यात अखंड ज्योतीची स्थापना केली जी गेल्या ७८ वर्षांपासून आजही अखंड प्रज्वलित आहे, संपूर्ण भारतवर्षामध्ये हे एकमेव श्री वरुणदेव जी यांचे मंदिर आहे. जे नर्मदा नदीच्या काठावर स्थित आहे आणि जिथे अखंड ज्योतीची स्थापना केली आहे येथे जल आणि ज्योतीचा अनोखा संगम बघायला मिळतो, आणि दिव्य आनंदाची अनुभूती होते.
२५ वे वंशज परम पूज्य ठाकूर साई ओमलाल साहिब जी यांचे सुपुत्र वर्तमान गादेश्वर २६ वे वंशज सिंधी समाजाचे आध्यात्मिक गुरु, अमरकथा ग्रंथाचे प्रचारक, सूर्यवंशी १००८ परम पूज्य ठाकूर साई मनीष लाल साहिब जी यांचे उल्हासनगरमध्ये आगमन झाले.
ह्या प्रसंगी उल्हासनगरमध्ये त्यांचे साधक जयप्रकाश शहदादपुरी व सेवकांनी भरुच शहर (गुजरात) मध्ये नर्मदा नदीच्या काठावर देशात एकमेव श्री झूलेलाल वरुण देव मंदिरामध्ये गेल्या ७८ वर्षांपासून अखंड स्थापित अखंड ज्योतीला वर्ल्डवाइड बुक ऑफ रेकॉर्ड आणि आयडियल इंडियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवण्याचा संकल्प केला.
Post a Comment
0 Comments