Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

साई इंग्लिश स्कूल प्रशासनाविरोधात शिवसेना ठाकरे गटासह नागरिकांचे उपोषण

 

                       ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

कल्याण पूर्वेतील साई इंग्लिश स्कूल शाळेतील ट्रस्टीचे काही आक्षेपार्ह सीसीटीव्ही व्हायरल झाल्यानंतर शहरात खळबळ उडाली होती. यानंतर शाळा प्रशासनाकडून व्हायरल व्हिडीओ मधील कर्मचार्यांना शाळेतून काढून टाकले आहे. मात्र आता शाळेतील संपूर्ण मॅनेजमेंट विरोधात वातवरण तापले असून ट्रस्टी बदलण्याच्या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेतृत्वाखाली उपोषण छेडण्यात आले आहे. दरम्यान व्हायरल व्हिडीओमध्ये कोणतेही तथ्य नाही मात्र शाळेतील विद्यार्थ्यावर त्याचा परिणाम होऊ नये यासाठी आरोप झालेल्या व्यक्तीला शाळेने काढून टाकले असून मॅनेजमेंट  विरोधात केलेले आरोप निरर्थक असल्याचे स्प्ष्टीकरण मॅनेजमेंट  सल्लागार दीपक पाटील यांनी दिले आहेत.


कल्याण पूर्वेतील साई इंग्लिश स्कूल या १५०० हून अधिक विद्यार्थी संख्या असलेल्या शाळेतील मॅनेजमेंट  विरोधातील काही आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाले होते. यानंतर याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. आता यात राजकीय पक्षांनी देखील उडी घेतली आहे. शाळेचे माजी ट्रस्टी म्हणवणाऱ्या एका व्यक्तीला शाळेतून काढून टाकत त्या जागी नव्या व्यक्तीची नेमणूक करण्यात आल्यानंतर संपूर्ण शाळेचे प्रशासनात फेरबदल झाले आहेत. मात्र यातून उफाळलेला वाद विद्यार्थ्यासाठी त्रासदायक ठरत असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने नारायण पाटील यांनी शाळेच्या प्रवेशद्वारावर उपोषण छेडले आहे.

शाळेतील चुकीच्या व्यक्तीमुळे शाळेची बदनामी होत असून विद्यार्थी संख्या रोडावत आहे. व्यवस्थापनाच्या मनमानी विरोधात धर्मादाय आयुक्त आणि शिक्षण विभागाकडे तक्रार करूनही कारवाई केली जात नसल्याने हे उपोषण पालकांच्या वतीने छेड्ल्याचे पाटील यांनी सांगितले. मात्र दीपक पाटील यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले असून शाळेचे व्यवस्थापन कोणत्याही चुकीला थारा देत नाही. आणि व्यवस्थापना बाबत सर्व पुरावे शिक्षण विभागासह धर्मादाय आयुक्ताकडे देण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.

 

Post a Comment

0 Comments