हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये चालत होते
ड्रग्सचे रॅकेट !
मानपाडा पोलिसांची कारवाई !
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण परिमंडळ तीन मध्ये पोलिसांनी अमली पदार्थ विरोधात मोठी कारवाई करत मोठ्या प्रमाणावर एमडी ड्रग्स जप्त केले आहे. डोंबिवलीच्या खोणी पलावा येथील डाउनटाऊन मधील एका हायप्रोफाईल सोसायटी मध्ये छापा टाकून पोलिसांनी दोन कोटी बारा लाख रुपयांचा एक किलो 93 ग्राम एम डी ड्रग्स जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली असून यामध्ये दोन पुरुष तर एका महिलेचा समावेश असून त्यांच्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे.
मानपाडा पोलीस ठाणे डोंबिवली यांनी गोपनीय बातमीदाराकडुन मिळालेल्या माहीतीनुसार गुरुवारी रात्री डाउन टाउन, खोणी पलावा याठिकाणी छापा टाकुन याठिकाणी मिळुन आलेल्या आरोपी कडुन एकुण १.९३ किलो मेफेड्रॉन (एमडी) एकुण कि.अं २.१२ करोड रकमेपेक्षा अधिक किंमतीचा अंमली पदार्थ जप्त करून त्यास अटक करून त्याच्या सोबत राहणाऱ्या परंतु पसार झालेल्या दोन साथिदारांना रातोरात ताब्यात घेवुन अटक केलेली आहे. तसेच इतर आरोपीतांचा शोध घेण्यात येत आहे. अटक आरोपी हे साठा केलेला अंमली पदार्थ हा अटक केलेल्या महिला आरोपीच्या मदतीने विक्री करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले असुन पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
हि कामगिरी पोलीस उप आयुक्त अतुल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांच्या मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिपान शिंदे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राम चोपडे, सपोनि कलगोंडा पाटील, संपत फडोळ, पोशि बडे, दिघे यांच्या पथकाने केली आहे.
Post a Comment
0 Comments