साई सिटी भव्य गृहप्रकल्पात उभारण्यात
येणार भव्य श्री जगन्नाथ मंदिर
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
निळजे,लोढाहेवन तसेच पलावा शहराजवळ साई सिटी भव्य गृहप्रकल्प उभारत असलेल्या ठिकाणी भव्य श्री जगन्नाथ मंदिर उभारण्यात येणार आहे. मंदिराच्या भव्य निर्माणासाठी साई सिटीचे डायरेक्टर संतोष दीक्षित व वीरेंद्र सिंग यांनी भगवान जगन्नाथ मंदिरासाठी जागा उपलब्ध करून दिल्याने ओडिया समाजातील भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
या ठिकाणी आता छोटे मंदिर असून त्यात भगवान जगन्नाथ यांचे वास्तव आहे. त्या ठिकाणी मागील दोन तीन वर्षापासून छोटे मोठे उत्सव होत असतात. काही दिवसांतच या ठिकाणी एक भव्य दिव्य मंदिर उभारले जाणार असून महाराष्ट्र राज्यात एक भव्य मंदिरामध्ये एकमेव असे हे भगवान जगन्नाथनाच्या मंदिराचे स्थान असणार आहे.
यावर्षी भगवान जगन्नाथ हर गुंडीचा मंदिर येथील ९ दिवस आपल्या स्थानापासून दरवर्षी प्रमाणे २७ जुन ते ५ जुलै २०२५ पर्यत त्यांच्या मावशीच्या घरी आज जात आहेत. आणि पुन्हा त्याच जल्लोषपूर्ण वातावरणात पुन्हा आपल्या निवासात ५ जुलै रोजी त्यांचे जल्लोषात साई सिटीच्या प्रांगणात असलेल्या मंदिरात आगमन होणार आहे. जल्लोषाच्या वातावरणात साई सिटीचे डायरेक्टर संतोष दीक्षित, विरेंद्र सिंग तसेच जगन्नाथ मंदिर कल्चरल चॅरिटेबल ट्रस्ट चे विश्वस्त एस एम गौडा यांनी भक्तगनांना व यात्रेत सामील झालेल्या असंख्य नागरीकाना शुभेच्छा दिल्या.
Post a Comment
0 Comments