ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कल्याण परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या उपस्थितीत खडकपाडा पोलीस स्टेशनच्या वतीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ अमरनाथ वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली सकाळी 6:30 वाजता कल्याण पश्चिमेतील वरटॅक्स बिल्डिंग वायले नगर येथे योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या योगा कार्यक्रमाचे तीन सत्रात आयोजन करण्यात आले होते. प्रथम सत्रात विविध ग्रुपने सांगीतिक योग प्रकार सादर केला तर मीनल जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र स्टेट योग साधना असोसिएशनच्या चिमुकल्या बाल मंडळीने संगीताच्या तालावर विविध आसने सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी पोलीस उप आयुक्त परिमंडळ 3 कल्याण मधील सर्व पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार, तसेच ज्येष्ठ नागरिक संघ, रोटरी क्लब ऑफ कल्याण सिटी, शाळा , कॉलेजचे विद्यार्थी, शिक्षक आणि विविध सामाजिक संस्था तसेच योग ग्रुप चे सदस्य असे मोठ्या प्रमाणात नागरिक या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
विशेष म्हणजे वय वर्ष तीन ते वय वर्ष 92 पर्यंतच्या योग साधकांनी सदर शिबिरात सहभाग घेतला. यावेळी सर्व सहभागी योगा ग्रुप व सामाजिक कार्यकर्ते व संस्था यांना प्रमुख पाहुण्यांचे हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता खडकपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अमरनाथ वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली प्रशांत अहिरे, सुनील वायले, प्रीतम चौधरी, प्रोजेक्ट चेअरमन मदन शंकलेशा, पोलीस नीरिक्षक संदीप शिवले, पोलीस उपनिरीक्षक अर्जुन डोमाडे, पोलीस हवालदार साहेबराव पाटील , पोलिस कॉन्स्टेबल तुषार सितान यांनी विशेष परीश्रम घेतले.
.jpg)







Post a Comment
0 Comments