माजी आमदार नरेंद्र पवार 30 हून अधिक
ठिकाणच्या कार्यक्रमात सहभागी
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
भारतीय जनता पक्षातर्फे कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील पाचही मंडलंलांमध्ये जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे भाजपच्या या मंडलांमध्ये झालेल्या 30 हून अधिक कार्यक्रमांमध्ये माजी आमदार नरेंद्र पवार यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्याचे दिसून आले.
याच पार्श्वभूमीवर भाजपा जुने कल्याण मंडल अध्यक्ष अमित धाक्रस, भाजप जुने कल्याण मंडल महिला मोर्चा अध्यक्षा हेमलता पवार, भाजप नवीन कल्याण मंडल अध्यक्ष स्वप्निल काठे, भाजप मोहने टिटवाळा मंडल अध्यक्ष नवनाथ पाटील, भाजप टिटवाळा मंडल अध्यक्ष शक्तीवान भोईर व माजी उपमहापौर उपेक्षा भोईर तसेच भाजपा महिला मोर्चा प्रदेश सचिव प्रिया शर्मा यांच्या माध्यमातून कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात ठिकठिकाणी योगा प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये माजी आमदार नरेंद्र पवार यांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेत विविध योगासने केली.
.jpg)


Post a Comment
0 Comments