Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

सामाजिक कार्यकर्ते संतोष शिंदे यांचा वाढदिवस सामाजिक कार्यातून साजरा

 

                 ब्लॅक अँड व्हाईट अंबरनाथ वार्ताहर 

अंबरनाथ मधील सामाजिक कार्यकर्ते श्री.संतोष शिंदे यांच्या वाढ दिवसानिमित अंबरनाथ मधील विविध ठिकाणी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले.अंबरनाथ मधील पश्चिम भागातील नाका कामगारांनी संतोष शिंदे यांचा वाढदिवस स्वतःहून साजरा केला.कामगारांच्या  हितासाठी आणि त्यांच्या हाकेला प्रत्येक वेळी धाऊन जाणारा कार्यकर्ता म्हणून नाका कामगारांनी स्वेच्छेने त्यांचा वाढ दिवस साजरा केला.कामगार बंधूंचे प्रेम बघून संतोष शिंदे भावुक झालेले दिसले."कामगारांनी आपल्या रोजच्या संघर्षमय असलेल्या जीवनात व्यस्त असूनही माझा वाढ दिवस साजरा केला,मी शतशः त्यांचे आभार मानतो " असे संतोष शिंदे यांनी यावेळी सांगितले.




 वाढ दिवसाच्या निमित्ताने आपल्या परिसरातील नागरिकांसाठी छाया हॉस्पिटलच्या सहयोगाने आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते.तसेच परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप केले.दहावी बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा जाहीर सत्कार करून त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देऊन त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

संतोष शिंदे यांच्या माध्यमातून अशा प्रकारचे विविध सामाजिक उपक्रम  दरवर्षी राबविले जातात.आणि यापुढेही असेच सामाजिक कार्य सतत सुरू राहील असे आश्वासन संतोष शिंदे यांनी दिले.

Post a Comment

0 Comments