कल्याण शहराचे"कल्याण" करण्याचा ध्यास घेणाऱ्या झुंझार समाज सेविका,राणी कपोते यांच्या उपोषणाचा हा १० वा दिवस.
कल्याणकर आणि स्थानिक नागरिकांचा उपोषणकर्त्या राणी कपोते यांना समर्थन.
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण-(सुभाष पटनाईक.)
कल्याण येथील ऐतिहासिक नगरीच्या पवित्र भूमीत जन्मलेली कल्पना उर्फ राणी दिलीप कपोते यांनी कल्याण नगरीला बजबजपुरीतून मुक्त करण्याचा आपल्या ध्यास घेतला आहे.त्यासाठी कल्याण पश्चिम स्टेशन परिसरातील स्वर्गीय दिलीप कपोते येथील वाहन तळाच्या बाहेर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
३१ में पासून, अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीचे व जागतिक तंबाखू विरोधी दिनाचे औचित्य साधून,कल्याणकरांच्या हितासाठी हा प्रशासनाच्या विरोधात बेमुदत उपोषणाचा मार्ग राणी कपोते यांनी धरला आहे.उपोषणाचा आजचा १० वा दिवस असून,आजही कल्याणकर व स्थानिक नागरिक राणी कपोते यांना समर्थन देण्यासाठी स्वाक्षरी करत आहेत.
झुंझार समाज सेविका राणी कपोते ह्या शिवसेना पक्षाचे स्थानिक नेते स्वर्गीय दिलीप कपोते यांच्या कन्या आहेत.वडिलांकडून सामाजिक कार्याची शिकवण आणि बालपणापासूनच मिळाल्याने राणी कपोते यांचे कल्याणकारांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतात.कल्याण परिसरातील विविध समस्यांबाबत मनपा प्रशासन आणि पोलिस प्रशासनाशी कल्याणच्या विकासासाठी लढा देत आहेत.
किल्लाच्या पायथ्याशी एका बाजूला सर्वात उंच असा भारत देशाचा तिरंगा ध्वज उभा करण्याची मागणी केली होती.ती ही मागणी अद्याप पूर्ण करण्यात आली नाही.
दुर्गाडी किल्ला जवळ,छत्रपती शिवाजी महारांचे तेजस्वी अश्वरुढ स्मारक ही मनपा प्रशासनाने उभे केले आहे;परंतु तिरंगा झेंडा उभा केल्यास ऐतिहासिक कल्याण नगरीची आणखीन शान वाढून, कल्याण शहराचे नाव जगात प्रसिद्ध होईल.तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली होती, "हर घर तिरंगा" याची जाणीव ठेवून,कल्याणचे कार्यसम्राट खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनता मनपा प्रशासनाने भारतातच नव्हे; तर महाराष्ट्रातील सर्वात उंच तिरंगा ध्वज दुर्गाडी पायथ्याजवळ उभारले पाहिजे असे उपोषणकर्त्या राणी कपोते यांनी सांगितले..
.jpg)


Post a Comment
0 Comments